आपुल्या घरात हाल सोसते मराठी..! 6 जिल्ह्यांमधील ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना मराठीही वाचता येईना; गणिताची स्थिती तर अधिक बिकट
Maharashtra Marathwada students cannot read and write Marathi : केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, मात्र राज्यातल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा वाचताच येत नाही, हे वास्तव समोर आलंय. मराठवाड्यातल्या 8 पैकी 6 जिल्ह्यांमधल्या जिल्हा परिषद शाळांच्या 29 टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही, अशी धक्कादायक बाब समोर आलीय. विभागीय आयुक्त प्रशासनानं पाहणी केली. यात विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याचं समोर आलंय. पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान पाहणी केली. त्यात इंग्रजी, गणित विषयांमध्येही विद्यार्थी कच्चे आहेत, असं या निष्कर्षात आढळून आलं आहे. हा अहवाल खुद्द शिक्षकांनीच दिलाय. लातूर आणि बीडचे निष्कर्ष अद्याप यायचेत. मात्र उर्वरित मराठवाड्यातले हे निष्कर्ष धक्कादायक आहे.
Dec 26, 2024, 11:40 AM ISTयूपीएससी परीक्षा : मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे
यूपीएससी परीक्षा विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या आश्वासनानंतर मागे घेतले.
Feb 17, 2020, 07:38 PM ISTएसटी परीक्षा नियंत्रकाच्या मनमानीचा मराठी मुलांना फटका
एस टी महामंडळाच्या परीक्षा घेणाऱ्या खाजगी यंत्रणेच्या अनागोंदी कारभारामुळे अनेक मराठी मुले परिक्षेपासून वंचित राहिली आहेत. परिवहन मंडळाच्या विविध पदासाठी लेखी परीक्षा सुरु आहेत. या परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी पत्रे आलीत. पण सुरक्षा रक्षकांनी अनेकांना परीक्षेलाच बसू दिले नाही. दुसरीकडे परभणीमध्येही अनेक परीक्षेला आलेल्या अनेक उमेदवारांचे नुकसान झाले आहे.
Nov 8, 2017, 01:57 PM ISTएमबीबीएस मराठी मुलांना पोस्ट ग्रॅज्युएटसाठी प्रवेश कठीण
राज्य सरकारच्या धोरण लकव्यामुळं एमबीबीएस झालेल्या मराठी मुलांना पोस्ट ग्रॅज्युएटसाठी प्रवेश मिळणं कठीण झालंय.
Apr 19, 2017, 09:19 AM ISTदिल्लीत मराठी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज
रेल्वेअॅप्रेंटीस च्या मुलांना रेल्वेत समावून घेण्यासाठी आंदोलन करणा-या मराठी मुला- मुलींवर दिल्लीतील रेल्वे मंत्रालयासमोर लाठीचार्ज झाला. यात महाराष्ट्रातील अनेक मुले जखमी झाली आहेत. मराठी मंत्री म्हणून सुरेश प्रभू यांच्याकडे हे विद्यार्थी आले असता त्यांना काठ्या खाव्या लागल्या आहेत. महाराष्ट्रातील दीड हजार मुलानी आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यानंतर या सर्व मुला मुलींना संसद मार्ग पोलिस ठाण्यात डांबण्यात आले.
Jan 31, 2017, 09:19 PM IST