मनोहर जोशी

कायदा हातात कोणी घेऊ शकत नाही - मुख्यमंत्री

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत कोणताही वाद नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलंय. मात्र, कोणीही कायदा हातात घेऊ शकत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांना लगावला आहे.

Nov 26, 2012, 01:38 PM IST

स्मारकासाठी कायदाही हातात घ्या - मनोहर जोशी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक शिवाजी पार्कातच व्हावं..अशा प्रसंगी कायदा विरोधात असेल तर कायदा हातात घेण्याचं आवाहन शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केलंय.

Nov 25, 2012, 04:49 PM IST

राज ठाकरेंमुळे मनोहरपंतानी मारली दांडी

रविंद्र नाट्य मंदिरात होणाऱ्या सोहळ्यात सेना मनसे एकत्र आलेच नाही. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर आज प्रथमच राज ठाकरे आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी एकाच मंचावर येत होते. परंतु, दुसरा कार्यक्रम असल्याचे सांगून मनोहर जोशी यांनी या कार्यक्रमाला येणे टाळले.

Oct 12, 2012, 09:22 PM IST

मनोहर जोशींच्या वक्तव्यावर पवारांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनोहर जोशी यांच्या वक्तव्याला उत्तर देताना सांगितलं, की राष्ट्रवादी काँग्रेस चांगल्या-वाईट काळात नेहमीच काँग्रेसला साथ देईल.

Aug 10, 2012, 03:15 PM IST

जोशी सरांचा पत्ता कट, अनिल देसाईंना राज्यसभेला उमेदवारी

शिवसेनेकडून अनिल देसाई यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलीय. महापालिका निवडणुकीत दादरमधल्या पराभवाने मनोहर जोशींचा पत्ता कट करण्यात झालाय. दादरमध्ये सर्व ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले होते. त्यामुळं पक्षनेतृत्व नाराज असल्याची असल्याची चर्चा होती.

Mar 15, 2012, 10:57 PM IST

मनोहर जोशी सर अडचणीत?

महापालिका निवडणुकीत दादर-माहिममध्ये शिवसेनेला दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर तिथली जबाबदारी असलेले ज्येष्ठ नेते मनोहर जोशींनी उद्या शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली आहे.

Feb 21, 2012, 09:04 PM IST

महायुतीची घोषणा अन् आठवलेंची चौफेर फटकेबाजी

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप आणि रिपाइंच्या जागावाटप अखेर निश्चित झाल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. मुंबईतील दादरच्या शिवसेना भवनात महायुतीच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, रिपाइचे अध्यक्ष रामदास आठवले, सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी उपस्थित होते.

Jan 13, 2012, 05:13 PM IST

मुंबईत युती होणार 'कशी', सांगतायेत 'जोशी'

महायुतीचं जागावाटप लांबणीवर गेलं आहे. अजून दोन दिवसांनी हे जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. मनोहर जोशींनी ही माहिती दिली आहे. आरपीआयला २९ जागा मान्य केल्या असल्या तरी आठवलेंचा ३० जागांचा हट्ट कायम आहे.

Jan 11, 2012, 03:02 PM IST

शिवसेनेचा लोकपालला विरोध – मनोहर जोशी

लोकपाल विधेयकांने समांतर सत्ताधिकारण निर्माण होऊन हा देशासाठी धोका असल्याचं मत शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार मनोहर जोशी यांनी आज लोकपालावरील चर्चेच्या वेळी बोलताना सांगितले.

Dec 29, 2011, 06:34 PM IST

सीमाभागातल्या मराठी जनतेला न्याय मिळेल...

पी.के.पाटील-महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष

राज ठाकरे यांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. सीमा भागातील मराठी बांधवांनी गेली ५६ वर्षे झालेल्या अन्यायाच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं आहे. या आंदोलनात दोन पिढ्या बरबाद झाल्या हे विसरून चालणार नाही. गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ ही चळवळ थांबली नाही. सीमा भागातील मराठी बांधव शांततेच्या मार्गाने आपल्या न्याय मागणीसाठी हा लढा देत आहेत.

Dec 21, 2011, 11:53 AM IST

'व्यास' पुराणाचा फटका 'जोशी' बुवांनाच

शिवसेना भाजपा युती सरकारच्या काळात मनोहर जोशी मुख्यमंत्रीपदी असताना त्यांचे जावई गिरीश व्यास यांनी शाळेसाठी आरक्षित असलेल्या प्रभात रोडवरील भूखंडावर टोलेजंग इमारत उभारली होती.

Oct 12, 2011, 03:20 PM IST