Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पातून महिलांना काय मिळणार? अजित पवार यांची मोठी घोषणा

Announcements For Farmers in Maharashtra Budget : अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा (Maharashtra Budget Session 2024-2025) जाहीर केल्या आहेत.

सौरभ तळेकर | Updated: Jun 28, 2024, 03:55 PM IST
Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पातून महिलांना काय मिळणार? अजित पवार यांची मोठी घोषणा title=
Ajit Pawar Announcements For Womens in Maharashtra

Maharashtra Budget Session 2024-2025 : महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत 2024-25 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) कोणत्या घोषणा करणार? यावर सर्वाचं लक्ष होतं. अशातच शिंदे सरकारने शेतकरी आणि महिला वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांसाठी अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. 

अर्थसंकल्पातून महिलांना काय मिळणार?

मध्य प्रदेशच्या लोकसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली योजना आता महाराष्ट्रात राबवण्यात येणार आहे. अर्थमंत्री अजित पवारांनी आज 'मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची' घोषणा केली. लाडकी बहिण योजनेतून 21 ते 60 वर्षे वयाच्या पात्र महिलांना प्रतिमहिना 1500 रुपये मिळणार आहेत. तसंच 25 लाख महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

मुलींना 100 टक्के मोफत शिक्षण देणार असून व्यावसायिक शिक्षणामध्ये 8 लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या मुलींना 100% टक्के सवलत देण्याची घोषणा देखील करण्यात आलीय. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. त्याचप्रमाणे महिलांसाठी राज्यात 10 हजार पिंक रिक्षा  देण्यात येतील, असं अजित पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

दरम्यान, अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात लाडकी बहिण योजना (Ladaki Bahin Yojaga) रावबण्यात येणार असल्याची घोषणा केली. या योजना अंर्तगत  लाभार्थी महिलांना 1500 रुपये प्रति माह दिले जाण्याची शक्यता आहे. कमीतकमी 3.50 कोटी महिलांना फायदा होण्याची आशा आहे. कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. तसेच मुलींना उच्च शिक्षणाचं प्रमाण वाढविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.