गुड न्यूज : ४० नव्या लोकल सेवा दाखल
मुंबईतल्या रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. पश्चिम रेल्वेकडून आजपासून तब्बल ४० नव्या सेवांचा शुभारंभ होतोय. यामध्ये चर्चगेट – वसई सकाळी विशेष महिला लोकल आणि मध्य रेल्वेच्या २२ नव्या सेवांचा समावेश आहे.
Mar 29, 2013, 09:39 AM ISTमध्य रेल्वेवर २२ नवीन फेऱ्या
मध्य रेल्वेने कर्जत-कसारा मार्गावर गुरूवार २८ मार्चपासून नव्या २२ लोकल फेऱ्या सुरू कणार आहे. त्यामुळे गर्दीतून प्रवाशांची काही प्रमाणात सुटका होणार आहे.
Mar 26, 2013, 11:49 AM ISTमध्य रेल्वेची आणखी एक लोकल, सेमी फास्ट गाडीही
मध्य रेल्वेने गर्दीवर मात करण्यासाठी नामी युक्ती शोधली आहे. त्यामुळे प्रवाशांना थोडासा दिलासा मिळणार आहे. दुस-या लोकलसाठी १५ एप्रिलचा मुहूर्त काढला आहे. तर दोन मार्गावर सेमी फास्ट गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतलाय.
Mar 14, 2013, 12:26 PM ISTरेल्वेवर फुकट्यांची मेहरबानी...
जानेवारी महिन्यात मध्य रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झालीय. मध्य रेल्वेनं केवळ एका महिन्यात अशा एकूण १ लाख १३ हजार फुकट्यांची नोंद केलीय.
Feb 13, 2013, 11:35 AM ISTप्रवाशांच्या हालअपेष्टांची त्रिमूर्ती, रेल्वेचे तिनही मार्ग विस्कळीत!
उपनगरीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवातच खराब झाली. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरच्या प्रवाशांना आज सकाळपासूनच विविध अडचणींना सामोरं जावं लागलं.
Jan 28, 2013, 01:19 PM ISTतांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत
गुरुवारी पहाटेच्या थंडीतच बदलापूरजवळ रेल्वेचा तांत्रिक बिघाड झालाय. त्यामुळे अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांची वाहतूक खोळंबलीय.
Jan 24, 2013, 08:44 AM IST‘२४ तास’चा पाठपुरावा; मृतांच्या कुटुंबीयांना रेल्वेकडून मदत
गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेवर सुरू असलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे ‘मेगा’हाल झाले. याच दरम्यान गर्दीमुळे पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
Jan 5, 2013, 08:31 AM ISTधावत्या रेल्वेत महिलांच्या मदतीसाठी... `एसओएस`
दिवसा किंवा रात्री प्रवास करणाऱ्या महिलांना अडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी रेल्वेच्या डब्यांमध्ये ‘एसओएस’प्रणाली सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा विचार सुरू आहे.
Jan 3, 2013, 05:10 PM ISTमध्य रेल्वेच्या ताफ्यात... `मोबाईल फर्स्ट एड बाईक`
मध्य रेल्वेनं प्रवाशांना तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवलीय. एका भंगार बाईकला अत्याधुनिक सेवांसहित सज्ज करून मध्ये रेल्वेनं एक ‘मोबाईल बाईक’ तयार केलीय.
Dec 18, 2012, 08:55 AM ISTट्रेनमधून खाली पडून २ ठार, २ जण गंभीर जखमी
मध्य रेल्वे मार्गावर चालत्या रेल्वेमधून चार जण खाली पडले. यापैंकी एकाचा मृत्यू झालाय तर तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. सायन-माटुंगा रेल्वे मार्गावर ही दुर्दैवी घटना घडलीय.
Oct 11, 2012, 12:41 PM ISTमाथेरानसाठी शटल सेवा सुरू
माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी मध्ये रेल्वेनं एक खुशखबर दिलीय. शनिवारपासून अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवा सुरू केलीय. मागील 40 वर्षांपासून सुरू असलेली स्थानिक नागरिक आणि पर्यटकांची मागणी अखेर पूर्ण झालीय.
Sep 30, 2012, 07:58 AM ISTआता कितीही पाऊस पडो... वांदा नाय!
मध्य रेल्वेच्या मुंबईतील उपनगरीय मार्गावर कितीही पाऊस पडला तरी सिग्नल यंत्रणा खराब होणार नसल्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केलाय.
Jun 3, 2012, 01:43 PM ISTरेल्वेचा मुंबईत प्लास्टिक हटाव नारा
मध्य रेल्वेने प्लास्टिक हटाव नारा दिला आहे. रेल्वे ट्रॅकवर साठणा-या प्लास्टिकच्या पिशव्या रॅंपरमुळे पाणी तुंबण्याचे प्रकार दुसरीकडे अशा स्थितीचा रेल्वे प्रशासनाला सामना करावा लागत होता. त्यामुळे यावर मात करण्यासाठी प्लास्टिकवर सरळ बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
May 28, 2012, 07:15 PM ISTमध्य रेल्वेला 'कोणी नव्या ट्रेन देतं का ट्रेन'?
उपनगरीय रेल्वेचा सर्वात जास्त विस्तार असलेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांना रेल्वे अर्थसंकल्पातून खूप अपेक्षा आहेत. लोकल गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या वाढवण्याची दरवर्षीची मागणी नेहमीच अपुरी राहते.
Mar 13, 2012, 06:46 PM ISTरेल्वे अपघातांना आळा बसणार का?
जीवघेण्या गर्दीमुळे लोकलमधून पडणे, रेल्वे ट्रॅक ओलांडणे, लोकल प्रवास करतांना रेल्वे खांबाचा धक्का लागणे, लोकलमध्ये चढतांना प्लॅटफॉर्म आणि लोकल ह्यांच्यामध्ये असलेल्या अंतराने अपघात होणे अशा विविध घटनांची गेल्या पाच वर्षातील धक्कादायक माहिती आणि आकडेवारी समोर आली आहे.
Mar 13, 2012, 03:50 PM IST