भ्रष्टाचार

लोकपाल विधेयकावर राष्ट्रपतींची सही

भ्रष्टाचार संपविण्यासाठी आंदोलन करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना यश मिळाले आहे. बहुचर्चित लोकपाल आणि लोकायुक्त विधेयकावर बुधवारी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे या लोकपाल विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाले आहे.

Jan 2, 2014, 08:09 AM IST

राहुल गांधींना ही उपरती की मोदींची भीती?

पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींशी टक्कर सोपी नाही, याची प्रकर्षानं जाणीव झाल्यानं राहुल गांधींनी भ्रष्टाचाराविरोधातला आपला सूर अधिक आक्रमक केलाय. मुंबईतल्या वादग्रस्त आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी राहुल गांधी यांनी घेतलेली भूमिका त्याचच द्योतक मानलं जातंय.

Dec 28, 2013, 07:47 PM IST

स्टींग ऑपरेशन : पोलीस प्रशिक्षण केंद्रातही लागते चिरी-मिरी!

सर्वात जास्त भ्रष्टाचारी खातं कोणतं? हा प्रश्न मनात आला तर उत्तर मिळतं पोलीस खातं... आणि ही बाब स्पष्ट होते ती, लाचलूचपत प्रतिबंध विभागाच्या आजवरच्या आकडेवारीवरुन.

Dec 25, 2013, 10:30 PM IST

पाहा, कोण आहे ‘आप’चं महाराष्ट्रातलं पहिलं टार्गेट...

दिल्लीमध्ये विजयाचा झेंडा रोवल्यानंतर आता आम आदमी पक्षानं महाराष्ट्रावर लक्ष्य केंद्रीत केलंय. महाराष्ट्रातल्या भ्रष्ट नेत्यांची सगळी प्रकरणं बाहेर काढण्याचा विडा आपनं उचललाय.

Dec 11, 2013, 10:26 PM IST

भ्रष्टाचारामुळे काँग्रेसचा पराभव - रामदेव बाबा

काँग्रेसचं भ्रष्ट राजकारण आणि राहुल गांधी यांच्यामुळे निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, अशी टीका रामदेव बाबा यांनी केली आहे. चुकीच्या धोरणांमुळे जनतेनं काँग्रेसला नाकारलं, असं रामदेव बाबा म्हणालेत.

Dec 8, 2013, 04:33 PM IST

<B><font color=red>टॉप १० : </font>जगातील सर्वांत जास्त भ्रष्टाचारी देश... </b>

‘ग्राफ्ट वॉचलॉग ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेनं जगातील देशांचं सर्वेक्षण करून भ्रष्टाचारात आघाडीवर असलेल्या देशांची एक यादी जाहीर केलीय... एक नजर टाकुयात सर्वात कमी भ्रष्टाचार आढळला त्या देशांवर...

Dec 4, 2013, 04:21 PM IST

<B><font color=red>टॉप १० : </font> जगातील सर्वांत कमी भ्रष्टाचारी देश.... </b>

‘ग्राफ्ट वॉचलॉग ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेनं जगातील देशांचं सर्वेक्षण करून भ्रष्टाचारात आघाडीवर असलेल्या देशांची एक यादी जाहीर केलीय... एक नजर टाकुयात सर्वात जास्त भ्रष्टाचार आढळला त्या देशांवर...

Dec 4, 2013, 04:21 PM IST

जगातील भ्रष्टाचारी देशांची यादी जाहीर; भारताचा नंबर आहे...

भारतात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार बोकाळला आहे... असं आपण बऱ्याचदा ऐकत असतो ना! पण, जगाच्या पाठिवर भ्रष्टाचारात भारताचा नंबर कितवा आहे...

Dec 4, 2013, 03:55 PM IST

नागपुरात पुन्हा सापडले कैद्यांजवळ मोबाईल्स

तुरुंग सुरक्षेचे सर्व कायदे धाब्यावर बसवत नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांजवळ मोबाइल फोन सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय.

Oct 17, 2013, 07:14 PM IST

पैसे खाणाऱ्या महिला पोलिसाची दबंगगिरी!

‘सद् रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद उराशी बाळगत पोलीस जनतेची सेवा करतात.. मात्र पिंपरीत एक महिला पोलीसानं खाकीला डाग लागावं असं वर्तन केलंय...

Oct 16, 2013, 11:33 AM IST

लालूंच्या शिक्षेचा आज फैसला

चारा घाटाळ्यात दोषी आढळलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना आज शिक्षा सुनावली जाणार आहे. विशेष सीबीआय न्यायालयात युक्तिवाद झाल्यानंतर त्यांना शिक्षा सुनावली जाईल.

Oct 3, 2013, 08:35 AM IST

त्याने १००० रुपये `खाल्ले`

एखाद्याने पैसै खाल्ले असे आपण सहज म्हणतो ऐकतो.. पण औरंगाबादच्या संतोष जाधव याने हे प्रत्यक्ष करुन दाखवलय.. 25 हजारांची लाच घेताना हा पठ्ठा रंगेहाथ पकडला गेला आणि पुरावे मिटवण्याच्या नादात त्यानं चक्क 1000 रुपयांची नोटच गिळली.

Oct 2, 2013, 12:06 AM IST

`आम आदमी पार्टी`चा शरद पवारांवर हल्लाबोल

शरद पवारांनी पदाचा गैरवापर करत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून कोट्यवधींची माया बेकायदा जमवल्याचा आरोप आम आदमी पार्टीनं केलाय.

Oct 1, 2013, 07:26 PM IST

विद्यार्थ्यांच्या बेंच खरेदीतही घोटाळा!

सहल घोटाळा, संगणक घोटाळा, कंपास पेटी घोटाळा... पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या घोटाळ्यांची ही मालिका. आता या मालिकेत आणखी एका घोटाळ्याची भर पडलीय. विद्यार्थ्यांसाठीच्या बेंच खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येतोय.

Aug 5, 2013, 09:03 PM IST

पुण्यातले खड्डे, भ्रष्टाचाराचे अड्डे!

पुण्यात सध्या बहुतेक सगळ्याच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्डे पडलेले हे रस्ते बनवण्यासाठी महापालिकेने तब्बल १३०० कोटी रुपये खर्च केले आहेत. एवढी मोठी रक्कम खर्च करूनही खड्डे का...

Jul 30, 2013, 05:39 PM IST