संसद बरखास्त करा – व्ही. के. सिंह
पाणी, जंगल या गोष्टी खासगी करण्यावर भर दिला जाता आहे. जनतेच्या जमिनी बड्या कंपन्याना दिल्या जात आहेत. सगळे पक्ष पक्ष गरिबांपेक्षा बड्या लोकांचे हित बघण्यात गुंतले आहेत, अशी सरकारवर जोरदार टीका करीत संसद बरखास्त करण्याची मागणी माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांनी केली.
Oct 29, 2012, 07:43 PM IST‘आरएसएसनं वापरला चोरीचा पैसा’
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी भाजप अध्यक्ष नितीन गडकरी आणि आरएसएसवर घणाघाती आरोप केले आहेत. गडकरी सार्वजनिक बांधकाममंत्री असताना नागपुरातल्या आरएएसच्या कार्यालयाचे बांधकाम झाले आहे. त्यामुळं यासाठी आलेला पैसा हा संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
Oct 25, 2012, 09:38 PM ISTझी २४ तासचा दणका; ‘कारभाऱ्यां’ना चपराक!
गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या 11 बंधा-यांच्या कामात पैशाचा मोठा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीवरून राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव, अर्थ खात्याच्या प्रधान सचिवासह 26 अधिकाऱ्यांवर न्यायालयाच्या आदेशानंतर सोमवारी रात्री उशीरा गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
Oct 23, 2012, 12:44 PM ISTबाई, मी विकत घेतला मीडिया!
आपल्या बातम्या बाहेर येऊ नयेत यासाठी बड बडे उद्योगपती मीडियाला विकत घेतात..कोळसा घोटाळ्यामुळे वादाच्या भोव-यात सापडलेले उद्योगपती नवीन जिंदाल यांच्यासाठी हा खेळ नवा नाही. याचा खुलासा करण्यासाठी कोणत्या पुराव्याचीही गरज नाही..
Oct 21, 2012, 02:49 PM ISTसोमय्यांचा भुजबळांवर नवा आरोप
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी छगन भुजबळ यांच्यावर आणखी एक बॉम्बगोळा टाकलाय. पुण्यातील हेक्सवर्ल्ड प्रकल्पात भुजबळांनी घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रकल्पात 40 फ्लॅट दिल्याचंही सोमय्या यांनी सांगितलय.
Oct 10, 2012, 05:01 PM ISTजलसंपदा खात्याच्या नेतृत्वावर पांढरेंचे ताशेरे
जलसंपदा खात्याच्या नेतृत्वावर विजय पांढरेंनी पुन्हा एकदा टीका केलीय. विवेक गमावलेल्या, लोभी, स्वार्थी, भ्रष्ट लोकांच्या हाती खातं गेल्यामुळे सिंचनप्रकल्पांत गैरव्य़वहार बोकाळल्याचा घणाघाती आरोप पांढरे यांनी केलाय.
Oct 8, 2012, 06:50 PM ISTजलसंपदा विभागात २० हजार कोटींची `गोलमाल`
जलसंपदा खात्याची श्वेतपत्रिका येईल तेव्हा येईल पण आता राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हाती धक्कादायक माहिती आलीय. जलसंपदा खात्याचे नाशिक येथील मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी 15 पानांचे एक पत्र राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पाठवले असून त्यात जलसंपदा विभागातील भ्रष्टाचारावर प्रकाश टाकण्यात आलाय.
Sep 23, 2012, 01:49 PM ISTपाक राष्ट्रपतींची भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी
पाकिस्तानचे राष्ट्रपती असीफ अली झरदारी यांच्या विरोधातल्या भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी होणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अशरफ यांनी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणीदरम्यान हे सांगितलयं.
Sep 18, 2012, 01:38 PM ISTपुण्यात उपजिल्हाध्यक्ष लाच घेताना अटक
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील कुळकायदा शाखेचे उपजिल्हाधिकारी किरण बापू महाजन यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता सापडली आहे. 24 लाख 24 हजारांची रोख रक्कम, 1 कोटी 79 लाख रुपये किंमतीचं सोने, स्थावर मालमत्ता आणि इतर मालमत्ता सापडली आहे.
Sep 13, 2012, 10:10 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसचं नक्की चाललंय काय?
राज्यात गेल्या दोन दिवसांत विविध घटनांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत अनेक जण अडकल्याचं चित्र उभं राहिलंय. सोलापूरात राष्ट्रवादीचे मंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करत असल्याचं उघड झालंय.
Sep 6, 2012, 04:17 PM IST`मौन`मोहन सिंगच भ्रष्टाचारी- वॉशिंग्टन पोस्ट
‘हजारों जवाबों से बेहतर है मेरी खामोशी’ म्हणणाऱ्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या खामोशीवर प्रख्यात अमेरिकन वृत्तपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’नेही टीकेची झोड उठवली आहे. मनमोहन सिंगच भारतातील भ्रष्ट सरकारचे प्रमुख आहेत, असा सनसनाटी आरोप ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने केला आहे.
Sep 5, 2012, 01:30 PM ISTमहावितरण अधिकाऱ्याला लाच घेताना अटक
वीजेच्या कनेक्शनसाठी लाचेची मागणी करणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्याला लाचलुचपत विभागानं नवीमुंबईत अटक केली आहे.
Aug 14, 2012, 10:51 AM ISTपदाचा गैरवापर करून वाळू उपसा घोटाळा
नागपुरात पदाचा गैरवापर करत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा प्रकरणात घोटाळा झाल्याचे उघडकीस आलंय. या प्रकरणात खनिकर्म विभागाच्या दोन कर्मचा-यांसह तिघांना अटक करण्यात आली आहे.
Aug 8, 2012, 08:19 AM ISTपिंपरी-चिंचवडच्या नगरसेवकांवर शिवसेनेचे आरोप
पिंपरीमधले नगरसेवक नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असतात. पण ही चर्चा चांगल्या कामांसाठी कमी इतर उद्योगांसाठीच जास्त असते. आताही पिंपरी चिंचवड मधले सत्ताधारी पक्षाचे नगर सेवक चर्चेत आलेत.
Jul 26, 2012, 07:33 PM ISTअण्णांच्या सहकाऱ्यांचं स्टिंग ऑपरेशन; पैसा येतो कुठून?
एका बाजुला टीम अण्णांच्या जंतर मंतरवर होत असलेल्या आंदोलनामुळं देशातलं वातावरण ढवळून निघण्याची चिन्ह असतानाच दुसऱ्या बाजुला ‘द वीक’ या इंग्रजी साप्ताहिकानं केलेल्या एका स्टींग ऑपरेशनमुळं खळबळ उडालीय. अण्णांच्या आंदोलनाला येणारा पैसा हा नेमका कुठल्या मार्गाने येतो, याची माहिती अण्णांच्या सहकाऱ्यांनी स्टींग ऑपरेशनमध्ये केल्याचा दावा ‘द वीक’ने केलाय.
Jul 25, 2012, 07:57 AM IST