भारतीय लष्कर

केरन सेक्टरमध्ये अतिरेक्यांची युद्धाची तयारी

भारताला नामोहरम करण्यासाठी पाकिस्ताने अतिरेक्यांशी हात मिळवणी केल्याचे भारत-पाक सीमेवर दिसून येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये घुसलेल्या अतिरेक्यांकडे अत्याधुनिक शस्त्रसाठा सापडला आहे. पकडण्यात आलेला सर्व शस्त्रसाठा युद्धादरम्यान वापरण्यासाठी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Oct 8, 2013, 12:30 PM IST

पाकिस्तान सैन्याकडून पुन्हा हल्ला

पाकनं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. मुजोर पाक सैन्यानं पुन्हा एकदा पूँछच्या खरी करमा परिसरात गोळीबार केलाय. या आठवड्यातील दुसऱ्यांदा हल्ला पाक सैन्याकडून करण्यात आलाय.

Aug 10, 2013, 09:38 AM IST

भारतीय लष्करात हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा

भारतीय लष्करात एका हवाई बोफोर्स घोटाळ्याचा पर्दाफाश झालाय. एका इटालीयन कंपनीक़डून 12 VVIP हेलिकॉप्टरची खरेदी करण्यासाठी लाचखोरी केल्याचा माजी हवाईदल प्रमुख एस.पी. त्यागी यांच्यावर आरोप झाल्याचं रॉयटर्स वृत्तसंस्थेनं म्हटलंय.

Feb 13, 2013, 07:37 PM IST

भारतीय सैन्याला दिसल्या १००हून जास्त `यूएफओ`

जम्मू काश्मीर आणि पूर्वोत्तर भागात चीनच्या सीमेलगत असलेल्या सैनिकांनी गेल्या तीन महिन्यांमध्ये १००हून जास्त उडत्या तबकड्या पाहिल्याचं सांगितलं आहे. लष्कर, डीआरडीओ, एनटीआरओ आणि आयटीबीपी सारख्या अनेक संस्थांनी प्रयत्न करूनही या चमकत्या तबकड्यांचं रहस्य उलगडलेलं नाही.

Nov 6, 2012, 09:15 PM IST

पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय सैनिक शहीद

जम्मू काश्मिरमधील पुंछ जिल्ह्यातील सीमा नियंत्रण रेषेजवळ (LOC) पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात भारतीय सेनेचा एक सैनिक शहीद झाला आहे. तर तर ३ सैनिक जखमी झाले आहेत.

Jun 14, 2012, 05:10 PM IST

'आर्मी'ची वाढली 'गुर्मी', लष्कर दिल्लीत घुसलं?

16 जानेवारीच्या रात्री भारतीय सेनेच्या दोन तुकड्या दिल्लीच्या दिशेने आल्याची खळबळजनक बातमी एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिली आहे.16 जानेवारीलाच भारतीय लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांनी जन्मतारखेच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

Apr 4, 2012, 11:02 AM IST

नाशिकमध्ये क्षेपणास्त्रांचं प्रदर्शन

नाशिकच्या देवळाली कॅम्प भागात अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचं प्रदर्शन अगदी थाटात पार पडलं. त्यातून भारतीय तोफ दलाची क्षमता दिसून आली. धाडसी कसरती सादर करत सैनिकांनी भारतीय लष्कर सक्षम असल्याचं सिद्ध केलं.

Jan 10, 2012, 04:36 PM IST

अहमदनगरमध्ये जवानांचा पासिंग परेड सोहळा

अहमदनगरमध्ये लष्कराच्या एमआयआरसीच्या प्रशिक्षण केद्रातील जवानांचा पासिंग परेड सोहळा उत्साहात पार पडला. १६२ जवानांनी दिमाखदार सोहळात लष्कराच्या यांत्रिकी पायदळात प्रवेश केला. या जवानांनी अनेक महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलंय.

Nov 25, 2011, 08:39 AM IST

युद्धभूमीवर आता 'शांती'

भारतीय लष्करात शांती टिग्गा या 35 वर्षीय महिलेनं स्वकर्तृत्व आणि स्वबळावर प्रवेश मिळवलाय. लष्करातली ही पहिलीच रणरागिणी ठरणार आहे. प्रांतिक सेनादलाच्या 969 रेल्वे अभियांत्रिकी तुकडीतून शांतीने लष्करात प्रवेश केलाय.

Oct 9, 2011, 01:06 PM IST