नाशिकमध्ये क्षेपणास्त्रांचं प्रदर्शन

नाशिकच्या देवळाली कॅम्प भागात अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचं प्रदर्शन अगदी थाटात पार पडलं. त्यातून भारतीय तोफ दलाची क्षमता दिसून आली. धाडसी कसरती सादर करत सैनिकांनी भारतीय लष्कर सक्षम असल्याचं सिद्ध केलं.

Updated: Jan 10, 2012, 04:36 PM IST

www.24taas.com, नाशिक

 

नाशिकच्या देवळाली कॅम्प भागात अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचं प्रदर्शन अगदी थाटात पार पडलं. त्यातून भारतीय तोफ दलाची क्षमता दिसून आली. बोफोर्स तोफा, १२० एमएम मोलटर गन, १०५ एमएम इंडियन फिल्ड गन, अचूक लक्ष्यभेद करणाऱ्या वैमानिक विरहीत विमानाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर झाली.

 

४० रॉकेट्स डागण्याची क्षमता असलेली मल्टी ब्यारल रॉकेट लॉन्चर आणि चेतन हेलिकॉप्टरचा संचार पाहता देवळाली कॅम्पमध्ये युद्धभूमी सदृश्य परिस्थिती असल्याचा भास होत होता. अवघ्या २३ सेकंदात शत्रूचा वेध घेणारं रॉकेट लॉन्चर सर्वांचं आकर्षण ठरलं. दोन मिनीटात आठ ते दहा बॉम्बचा मारा करुन शत्रूला बुचकाळ्यात पाडणाऱ्या मोल्टर गननं प्रेक्षकांची मने जिंकली.  नैसर्गिक आपत्तीवेळी उपयोगात आणलं जाणाऱ्या ग्लायडरच्या थरारक कसरतीही यावेळी सादर झाल्या.

 

पॅराफिल्ड रेजीमेंटनं पॅराशूट तंत्रज्ञानानं वैद्यकीय उपचारांची तप्तरता दाखवली. अत्याधुनिक रडार यंत्रणा आणि टेहळणी उपकरणांनी शत्रूच्या गोटातील हालचालींचा अचूक वेध दाखवला. धाडसी कसरती सादर करत सैनिकांनी भारतीय लष्कर सक्षम असल्याचं सिद्ध केलं.