भारतीय चलन

या देशांत भारतीय चलन रुपया मोठा

जरी डॉलर जगात शक्तीशाली असला तरी भारतीय रुपया या देशांमध्ये मोठा आहे. कारण काही देशांमध्ये रुपयाची किंमत चांगली आहे. त्यामानाने या देशांचे चलन रुपयाच्या किमतीपेक्षा कमी आहे. त्यामुळे या देशांत रुपया सबसे बडा भैया आहे. त्यामुळे तुम्ही या देशात चांगले शॉपिंग करु शकता.

Sep 26, 2015, 02:12 PM IST

भारतीय 'रुपयां'वर आता दिसणार डॉ. एपीजे अब्दुल कलाम?

'सामान्यांचे राष्ट्रपती' भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना शासकीय इतमातात अखेरचा निरोप देण्यात आला. डॉ. कलाम यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक मागणी जोर धरू लागलीय. ती म्हणजे 'मिसाईल मॅन' कलामांचा फोटो भारतीय चलनावर असावा.

Aug 2, 2015, 08:20 AM IST

२००५ पूर्वीच्या नोटा बदलण्याचे अखेरचे आठ दिवस

आपल्याकडे २००५ पूर्वीच्या जुन्या नोटा असल्यास त्या लवकरात लवकर बदलून घ्या. कारण ३० जूननंतर त्या सर्व नोटा बाजारातून बाद करण्यात येणार आहेत. यामध्ये ५०० आणि १००० च्या नोटांचाही समावेश असून ते बदलून घेण्यासाठी शेवटचे फक्त आठ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर २००५ पूर्वीच्या सर्व नोटा चलनातून हद्दपार करण्यात येणार आहेत. 

Jun 22, 2015, 07:42 AM IST

भारतीय चलनात कागदाऐवजी प्लास्टिक नोटा

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार १० रूपयांच्या प्लास्टिक नोटा जूननंतर चलनात येणार आहेत. २०१४ च्या उत्तरार्धात या नोटांचे फिल्ड परीक्षण होणार आहे. कोच्ची, म्हैसूर, शिमला, जयपूर, भूवनेश्वर या शहरात प्लास्टिकच्या नोटा सर्वात आधी परीक्षणासाठी चलनात आणल्या जातील.

Feb 7, 2014, 09:41 PM IST

चीनकडून आता भारतीय बनावट नोटा

आधी पाकिस्तान आणि आता चीन. भारताची अर्थव्यवस्था कशी कोसळेल हा या दोन्ही देशांचा हेतू आहे. हा हेतू साध्य करण्यासाठी आधी पाकिस्तानमधून भारतीय बनावट नोटा येत होत्या. मात्र, आता चीनही याच मार्गावर चालतोय. चीनमधून मोठ्या प्रमाणात भारतीय बनावट नोटा पाठवण्याचे काम सुरु आहे.

Jul 16, 2013, 12:57 PM IST