भारतीय 'रुपयां'वर आता दिसणार डॉ. एपीजे अब्दुल कलाम?

'सामान्यांचे राष्ट्रपती' भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना शासकीय इतमातात अखेरचा निरोप देण्यात आला. डॉ. कलाम यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक मागणी जोर धरू लागलीय. ती म्हणजे 'मिसाईल मॅन' कलामांचा फोटो भारतीय चलनावर असावा.

Updated: Aug 2, 2015, 08:20 AM IST
भारतीय 'रुपयां'वर आता दिसणार डॉ. एपीजे अब्दुल कलाम? title=

नवी दिल्ली: 'सामान्यांचे राष्ट्रपती' भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना शासकीय इतमातात अखेरचा निरोप देण्यात आला. डॉ. कलाम यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक मागणी जोर धरू लागलीय. ती म्हणजे 'मिसाईल मॅन' कलामांचा फोटो भारतीय चलनावर असावा.

डॉ. अब्दुल कलाम यांचं देशासाठीचं योगदान अतुलनिय आहे. अशातच त्यांचा सन्मान झाला पाहिजे. आपल्या आयुष्यातील महत्त्वाची चार दशकं डॉ. कलाम यांनी इस्रोला दिले आहेत, अशा प्रकारची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.

१९९८मध्ये भारतातील पहिली अणूचाचणी, मिसाईल परीक्षणात डॉ. कलाम यांचं योगदान महत्त्वाचं होतं. त्यांच्या कामासाठी देशातील सर्वोच्च सन्मान भारतरत्ननं त्यांचा गौरव करण्यात आलाय. खरं तर सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चेचा आणि वास्तवाचा काहीही संबंध नाही. मात्र डॉ. कलाम गेल्यानंतर सामान्य नागरीकांच्या या भावना उफाळून आल्या आहेत. आता सरकार सामान्यांच्या या भावनांचा किती सन्मान करेल हे पाहावं लागेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.