भारतीय चलनात कागदाऐवजी प्लास्टिक नोटा

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार १० रूपयांच्या प्लास्टिक नोटा जूननंतर चलनात येणार आहेत. २०१४ च्या उत्तरार्धात या नोटांचे फिल्ड परीक्षण होणार आहे. कोच्ची, म्हैसूर, शिमला, जयपूर, भूवनेश्वर या शहरात प्लास्टिकच्या नोटा सर्वात आधी परीक्षणासाठी चलनात आणल्या जातील.

Updated: Feb 7, 2014, 09:41 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार १० रूपयांच्या प्लास्टिक नोटा जूननंतर चलनात येणार आहेत. २०१४ च्या उत्तरार्धात या नोटांचे फिल्ड परीक्षण होणार आहे. कोच्ची, म्हैसूर, शिमला, जयपूर, भूवनेश्वर या शहरात प्लास्टिकच्या नोटा सर्वात आधी परीक्षणासाठी चलनात आणल्या जातील.
१ अब्ज १० रूपयांच्या नोटांवर परीक्षण करण्यात येणार आहे. लोकसभेत भूदेव चौधरी यांनी विचारलेल्या प्रश्नावर वित्त राज्यमंत्री नमो नारायण मीणा यांनी संदर्भात उत्तर दिले. वित्त राज्यमंत्री नमो नारायण मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार १० रूपयांच्या प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. भौगोलिक विविधता आणि वातावरण या घटकानां लक्षात घेऊन पाच निवडक शहरामध्ये प्रायोगिकतत्वावर प्लास्टिकच्या १० रूपयांच्या चलनात आणल्या जातील.
रिझर्व्ह बँक दरवर्षी खराब झालेल्या २० टक्के नोटा चलनातून बाद करते. प्लास्टिकच्या नोटा कागदी नोटांपेक्षा अधिक काळ टिकतात. त्यामुळे या समस्यावर प्लास्टिकच्या नोटा वनटाईम सोल्युशन असणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.