भाजपवर टीका

मंदिर वही बनायेंगे, तारीख नही बतायेंगे- उद्धव ठाकरेंची घोषणा

शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मंदिर वही बनायेंगे, तारिख नही बतायेंगे असा सणसणीत टोलाही त्यांनी भाजपाला लगावला आहे. राम मंदिर बांधण्याच्या घोषणा पोकळ असल्याची टीकाही उद्धव यांनी केली.

Oct 22, 2015, 07:57 PM IST

सेनेच्या नार्वेकरांची माघार, विधान परिषद बिनविरोध

विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. शिवसेनेच्या राहुल नार्वेकरांनी माघार घेतल्यामुळं निवडणुकीच्या रिंगणात ९ उमेदवार राहिल्यानं निवडणूक बिनविरोध झाली आहे. विधान परिषदेच्या नऊ जागा रिक्त झाल्या होत्या. मात्र यासाठी १० जणांचे अर्ज आल्यामुळं निवडणूक होणार होती. आता राहुल नार्वेकर यांनी माघार घेतल्यामुळं निवडणून बिनविरोध झाली असून घोडबाजारालाही चाप बसला आहे.

Mar 13, 2014, 02:45 PM IST

हत्येला मी घाबरत नाही, भाजप जातीय दंगल घडवतं - राहुल

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधींनी भाजपवर हल्लाबोल केलाय. भाजप मतांसाठी जातीय दंगली घडवत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. आपल्या आजी आणि बाबांची हत्या करण्यात आली त्यामुळं आपल्यालाही जिवंत ठेवणार नसल्याचं वक्तव्य केलं. मात्र आपण घाबरत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Oct 23, 2013, 02:43 PM IST