NZ vs AFG: वर्ल्डकपमध्ये अजून एक मोठा उलटफेर; अफगाणिस्तानकडून न्यूझीलंडच्या टीमचा पराभव

NZ vs AFG: अफगाणिस्तानच्या टीमने न्यूझीलंडचा पराभव केल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अफगाणिस्तानच्या टीमसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. 

सुरभि जगदीश | Updated: Jun 8, 2024, 09:31 AM IST
NZ vs AFG: वर्ल्डकपमध्ये अजून एक मोठा उलटफेर; अफगाणिस्तानकडून न्यूझीलंडच्या टीमचा पराभव title=

NZ vs AFG: टी-20 वर्ल्डकपच्या 14 व्या सामन्यात अफगाणिस्तान विरूद्ध न्यूझीलंड यांच्या लढत रंगली होती. या सामन्यात पुन्हा चाहत्यांना मोठा उटलफेर पहायला मिळाला. अफगाणिस्तानच्या टीमने न्यूझीलंडचा पराभव केल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अफगाणिस्तानच्या टीमसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. या सामन्यात न्यूझीलंडचा 84 रन्सने पराभव झाला आहे.

गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी केली. यावेळी 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 159 रन्स केले. यावेळी अफगाणिस्तानकडून रहमानउल्ला गुरबाजने टीमसाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने 56 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 80 रन्सची खेळी केली. यावेळी बोल्ट आणि हेन्री यांनी न्यूझीलंडकडून सर्वाधिक 2-2 विकेट घेतल्या. तर न्यूझीलंडची टीम अवघ्या 75 रन्समध्ये ऑलआऊट झाली.

या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय न्यूझीलंडच्या टीमसाठी फारसा चांगला घेतल्याचं दिसलं नाही. अफगाणिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खूपच खराब झाली. डावाच्या पहिल्याच बॉलवर टीमला पहिला धक्का बसला. किवी टीमने तिसऱ्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर डेव्हॉन कॉनवेच्या रूपाने दुसरी विकेट गमावली. कॉनवेने 10 चेंडूत 1 चौकाराच्या मदतीने 8 रन्स केले. यानंतर तिसला चौथा धक्का डॅरिल मिशेलच्या रूपाने बसला. त्यानंतर कर्णधार केन विलियम्सनलाही चांगला खेळ करता आला नाही. 

अखेरीस 16 व्या ओव्हरपर्यंत न्यूझीलंडची संपूर्ण टीम पव्हेलियनमध्ये परतली होती. अफगाणिस्तानकडून फजलहक फारुकी आणि कर्णधार राशिद खान यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतले. दोन्ही गोलंदाजांनी 17-17 रन्स दिले. कर्णधार राशिदने पूर्ण 4 ओव्हरने टाकली. उर्वरित दोन विकेट मोहम्मद नबीने घेतल्या. नबीने 4 षटकात 16 रन्स दिले.