Rohit Sharma: पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातून रोहित शर्मा बाहेर? सोशल मीडिया पोस्टमुळे खळबळ

T20 World Cup 2024: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील T20 वर्ल्डकप 2024 सामना रविवारी भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Jun 8, 2024, 12:28 PM IST
Rohit Sharma: पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातून रोहित शर्मा बाहेर? सोशल मीडिया पोस्टमुळे खळबळ title=

T20 World Cup 2024: रविवारी क्रिकेटप्रेमींसाठी खूप मोठा दिवस आहे. अमेरिकेच्या मैदानावर भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 8 वाजता हा सामना सुरु होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्मा खेळणार नाही, असा प्रश्न एका सोशल मीडिया पोस्टमुळे उपस्थित होतंय. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील T20 वर्ल्डकप 2024 सामना रविवारी भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचं खेळणं संशयास्पद मानलं जातंय.

पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातून रोहित शर्मा बाहेर?

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. संजना गणेशनने तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय की, 'जसप्रीत टॉस करण्यासाठी जाण्याची वाट पाहू शकत नाही.' संजनाच्या या पोस्टनंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदावरून एकच चर्चा रंगली. 

संजना गणेशनच्या या पोस्टवरून असा अंदाज लावण्यात येतोय की, जसप्रीत बुमराह पाकिस्तानविरुद्धच्या टी- 20 वर्ल्डकपच्या सामन्यात कर्णधार म्हणून टॉससाठी मैदानात येणार आहे. याचा अर्थ नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे पाकिस्तानविरुद्ध टी-20 वर्ल्डकप  सामना खेळू शकणार नाही, असा समज अनेकांचा झाला आहे. 

चाहत्यांनी दिलं रिएक्शन

इंस्टाग्रामवर काही चाहत्यांनी संजना गणेशनच्या या पोस्टला जाहिरात म्हटलंय. याशिवाय काही लोकांच्या म्हणण्यानुसार, दुखापतीमुळे रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्ध टी-20 वर्ल्डकप सामना खेळू शकला नाही. तर त्याच्या जागी टीमच्या नेतृत्वाची धुरा हार्दिक पांड्याकडे असणार आहे. कारण हार्दिक पांड्या हा भारतीय टीमचा उपकर्णधार आहे. कर्णधाराच्या अनुपस्थितीत, उपकर्णधार संघाची जबाबदारी घेतो. 

आत्तापर्यंत टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये एकूण 7 सामने खेळले गेले आहेत. T20 वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध 7 पैकी 6 सामने जिंकले आहेत. यामध्ये पाकिस्तानने केवळ एक सामना जिंकण्यात यश आलं आहे. यावेळी रोहितच्या सेनेचे लक्ष्य टी-20 वर्ल्डकप पाकिस्तानविरुद्ध सातवा विजय नोंदविण्याचं असणार आहे.