बाबा रामदेव

पुत्रप्राप्तीच्या औषध विक्रीत अडकले बाबा रामदेव

जेडीयूचे खासदार के.सी.त्यागी यांनी बाबा रामदेव यांच्या पूत्र जन्मासाठीच्या औषधाचा मुद्दा आज संसदेत उपस्थीत केला. के.सी.त्यागी यांनी त्या औषधाची पाकीटं देखील संसदेत दाखवली. औषधांची पाकीटं त्यांनी स्वत: विकत आणली होती. आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 

Apr 30, 2015, 02:12 PM IST

भूकंप पीडित ५०० अनाथ मुलांना बाबा रामदेव घेणार दत्तक

योग गुरू बाबा रामदेव यांनी नेपाळ मधील भूकंपात अनाथ झालेल्या ५०० बालकांना दत्तक घेण्याची घोषणा केली आहे. योगगुरू आचार्य बालकृष्ण यांच्यासोबत पंतजली योगपीठद्वारे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरानंतर बोलतांना, बाबा रामदेव यांनी घोषणा केली की भूकंप पीडितांना शक्य तितकी मदत केली जाईल. 

Apr 28, 2015, 11:46 AM IST

पद्म सन्मान पुरस्कारासाठी अडवाणी, रामदेवबाबा, श्री.श्री. यांची नावे

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, योगगुरू रामदेव, श्री श्री रवीशंकर यांना पद्म सन्मान देण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास शंभर मान्यवरांना पद्म सन्मान पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे. प्रजासत्ताक दिनाआधी त्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Jan 23, 2015, 10:06 AM IST

बाबा रामदेव यांनी शड्डू ठोकून कुस्तीचा आखाडा जिंकला

बाबा रामदेव यांनी या वयातही कुस्तीचं मैदान मारलं आहे, आपल्या पेक्षा वयाने लहान असणाऱ्या युवा कुस्तीपटूला त्यांनी एकदा नाही, तर दोन-दोन तीन-तीन वेळेस आस्मान दाखवलं आहे. बाबा रामदेव यांचे डावपेचही तसेच आहेत, त्यांचा कुस्ती खेळण्याचा उत्साह तर त्याहून दांडगा आहे.

Jan 5, 2015, 02:46 PM IST

`बाबा रामदेवांचे डोके आणणाऱ्याला 1 कोटींचे बक्षीस`

बहुजन समाज पक्षाचे उमेदवार भगवानसिंह चौहान यांनी बाबा रामदेवांचे डोके कापून आणणाऱ्याला एक कोटी रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केलीय.

May 6, 2014, 01:23 PM IST

मोदींची पत्नी रामदेवबाबांच्या आश्रमात?

`द वीक` या इंग्रजी साप्ताहिकानं केलेल्या दाव्यानुसार, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आपल्या पत्नीला रामदेवबाबांच्या आश्रमात पोहचवलंय.

Apr 24, 2014, 11:49 AM IST

मोदींचा कुरेशीवर तर बाबा रामदेंवर काँग्रेसचा हल्लाबोल

मांसाचा व्यापारी मोईन कुरेशीचा केंद्रातल्या चार मंत्र्यांशी असलेल्या संबंधांचा झी मीडियानं पर्दाफाश केल्यानंतर आता नरेंद्र मोदींनीही सरकारवर हल्लाबोल केलाय. दरम्यान, काळ्या पैशांच्या मुद्यावरुन मोहीम उघडणारे योगगुरु बाबा रामदेव आता स्वत:च काळ्या पैशांच्या मुद्यावरून अडचणीत आलेत. त्यांना भाजपने पाठिशी घातलेय तर काँग्रेसने हल्लाबोल केलाय.

Apr 18, 2014, 07:38 PM IST

बाबा रामदेव फसले; पैशाची देवाण-घेवाण चव्हाट्यावर

योग गुरू बाबा रामदेव आणि भाजपचे उमेदवार महंत चंदनाथ यांच्यातली पैशांची देवाण-घेवाण चव्हाट्यावर आलीय. खुद्द बाबा रामदेवांनीच ही पैशांची देवाण-घेवाणबद्दल माईकसमोर कथन केलीय... पण, अनावधानानं.

Apr 18, 2014, 12:43 PM IST

काँग्रेसमध्ये ‘गे’ भरलेत - बाबा रामदेव

पुन्हा एकदा समलैंगिक सबंधावरून योगगुरू बाबा रामदेव यांनी सरळ काँग्रेसवर निशाना साधला आहे. काँग्रेसवर टीका करताना काँग्रेसवाले समलैंगिक संबंधाचे का करत आहेत? यावरून काँग्रेसमध्ये `गे` लोकांचा भरणा आहे, अशी कडवड भाषा वापरली.

Dec 18, 2013, 03:52 PM IST

बाबा रामदेव यांची लंडन विमानतळावर चौकशी

लंडनच्या हिथ्रो आंतरराष्ट्रीय विमानतळावर योगगुरू बाबा रामदेव यांना रोखण्यात आलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार बाब रामदेव यांची विमानतळावर सहा तास चौकशी झाली.

Sep 21, 2013, 07:54 AM IST

काँग्रेस विरोधात करणार देशव्यापी आंदोलन- रामदेवबाबा

योगगुरू रामदेवबाबा यांनी पुन्हा एकदा काँग्रेस सरकारविरोधात रणशिंग फुंकलंय. येत्या १३ सप्टेंबरपासून त्यांनी देशव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केलीय. काँग्रेस सरकार भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यात आणि काळा पैसा परत आणण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत रामदेवबाबांनी ही घोषणा केली.

Sep 9, 2013, 04:24 PM IST

'अक्कल असती तर पप्पूला मीच पंतप्रधान केलं असतं'

योगगुरु रामदेव बाबा आता योगा सोडून आता राजयोगाला लागलेत. ‘काँग्रेस हे लोकांच्या धोरणांना विरोध करणारे सरकार आहे तसेच रायबरेलीला १९७७ मध्ये इंदिरा गांधीची जशी अवस्था झाली तशीच सोनिया गांधीची होणार आहे’ असं म्हणत मोठी टीका केलीय.

Jul 18, 2013, 11:52 AM IST

३ सूत्र आणि १०० वर्ष जगू शकतात तुम्ही!

सध्याच्या जीवन शैलीनुसार १०० वर्ष जगणं खूप कठीण झालं आहे. पण योग, आयुर्वेद आणि प्राकृतिक चिकित्सा केल्यास प्रत्येक व्यक्ती १०० वर्ष जगू शकतो. सध्या योग जनसामान्यपर्यंत पोहचला आहे.

May 6, 2013, 05:42 PM IST

बाबा रामदेवांवर होऊ शकतो हल्ला?

योग गुरू बाबा रामदेव यांच्यावर प्राणघातक हल्ला होऊ शकतो, अशी भीती त्यांच्या जवळच्या लोकांनी व्यक्त केली आहे

Apr 28, 2013, 04:27 PM IST