काँग्रेसमध्ये ‘गे’ भरलेत - बाबा रामदेव

पुन्हा एकदा समलैंगिक सबंधावरून योगगुरू बाबा रामदेव यांनी सरळ काँग्रेसवर निशाना साधला आहे. काँग्रेसवर टीका करताना काँग्रेसवाले समलैंगिक संबंधाचे का करत आहेत? यावरून काँग्रेसमध्ये `गे` लोकांचा भरणा आहे, अशी कडवड भाषा वापरली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 18, 2013, 10:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पुन्हा एकदा समलैंगिक सबंधावरून योगगुरू बाबा रामदेव यांनी सरळ काँग्रेसवर निशाना साधला आहे. काँग्रेसवर टीका करताना काँग्रेसवाले समलैंगिक संबंधाचे का करत आहेत? यावरून काँग्रेसमध्ये `गे` लोकांचा भरणा आहे, अशी कडवड भाषा वापरली.
सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात समलैंगिक संबंध हा भारतात गुन्हाच असल्याचा निकाल दिला आहे. मात्र, असे असताना कॉंग्रेसकडून त्याचे समर्थन होताना दिसते, यावर तीव्र नापसंती बाबा रामदेव यांनी व्यक्त केली. रामदेवबाबांनी याआधीच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले आहे.
देशात समलैंगिकतेवर नापसंती व्यक्त होत आहे. तरीही काँग्रेसवाले अशा प्रकारच्या संबंधांचे समर्थन करतात. यावरून कॉंग्रेसमध्ये ‘गे’ लोकांचाच भरणा असल्यानेच बहुधा पक्षाकडून या संबंधांचे समर्थन होत असावे, असे मत बाबा रामदेव यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे या वक्त्यांवरून वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
समलैंगिक संबंध हा एक आजार आहे आणि त्याचा इलाज हवा असेल तर तो माझ्याकडे आहे. कॉंग्रेसने आपल्याकडील समलैंगिक लोकांना माझ्या आश्रमात पाठवले तर त्यांच्यावर चांगला उपचार होऊ शकेल, असे सांगत रामदेव यांनी कॉंग्रेसवर तोंडसुख घेतले आहे.
दरम्यान, यावेळी बाबा रामदेव यांनी आम आदमी पार्टीची खिल्ली उडवली. दिल्लीत यश मिळाले तरी लोकसभेत या पक्षाला दोन ते चार जागाच मिळतील. त्यांचा प्रयत्न असफल होईल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.