पद्म सन्मान पुरस्कारासाठी अडवाणी, रामदेवबाबा, श्री.श्री. यांची नावे

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, योगगुरू रामदेव, श्री श्री रवीशंकर यांना पद्म सन्मान देण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास शंभर मान्यवरांना पद्म सन्मान पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे. प्रजासत्ताक दिनाआधी त्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Updated: Jan 23, 2015, 10:10 AM IST
पद्म सन्मान पुरस्कारासाठी अडवाणी, रामदेवबाबा, श्री.श्री. यांची नावे title=

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, योगगुरू रामदेव, श्री श्री रवीशंकर यांना पद्म सन्मान देण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास शंभर मान्यवरांना पद्म सन्मान पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे. प्रजासत्ताक दिनाआधी त्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

चित्रपट अभिनेते रजनीकांत, गीतकार प्रसून जोशी ,पत्रकार रजत शर्मा, बिग बी अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, रजनीकांत, दिग्दर्शक संजय लिला भन्साली, सुशील कुमार, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांची नावे निश्चित करण्यात आली आहे.

यादीतील बहुतांश मान्यवर भाजपचे शुभचिंतक आहेत. तर काही जण लवकरच भाजपशी जुळू शकतात. एनसीईआरटीचे माजी संचालक जे. एस.राजपूत यांचेही नाव यादीत आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.