बर्फ

नाशिकमध्ये वर्षातली सर्वात मोठी गारपीट, साचला ६ इंचाचा बर्फाचा थर

नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात गारपीट झालीय. वडांगळी परिसरात तर गारपीटीनं अक्षरशः कहर केलाय. गारांचा चक्क सहा इंचांचा थर साचलाय.

Mar 14, 2015, 02:02 PM IST

थंडीचा कडाका, सातपुड्याच्या डोंगर रांगांवर बर्फाची चादर

गेल्या पाच दिवसापासून सातपुड्याच्या डोंगर रांगा पांढ-या रंगाचा शालू पांघरून बसल्या आहेत. हिवाळ्यामध्ये हिरवळीने सजलेला हा परिसर आता बर्फाच्या कणांनी आच्छादला गेला आहे. 

Dec 22, 2014, 11:50 AM IST

अमेरिकेत बर्फाचे डोंगर, गोठून ७ जणांचा मृत्यू

अमेरिकेत सध्या व्हाईट इमरजन्सी, अमेरिकेच्या सर्व ५० राज्यात शून्य अंशांखाली पारा उतरला. बर्फामुळे अनेक हायवे बंद असून १९७६ नंतर प्रथमच पडली एवढी थंडी पडली आहे. या थंडीचे सात जण बळी गेले आहेत.

Nov 21, 2014, 08:24 AM IST

अबब! तब्बल २१ वर्षांनी सापडला जवानाचा मृतदेह

सियाचीनमधील बर्फाळ प्रदेशात मृत्यूमुखी पडलेल्या जवानाच्या मृतदेहाचे अवशेष तब्बल २१ वर्षांनी सापडले आहेत. सांगलीतील जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या हवालदार टी. व्ही. पाटील यांचा फेब्रुवारी १९९३ साली मृत्यू झाला होता. 

Oct 18, 2014, 02:03 PM IST

उत्तराखंडात बर्फवृष्टीची चादर

जिथे पाहावं तिथं बर्फ.. पांढ-या शुभ्र बर्फाची दुलई पांघरून सध्या काश्मिर आणि हिमाचल प्रदेश पहुडलंय. त्यामुळे पर्यटकांसाठी ही एक पर्वणी झालीय. हिवाळ्यातल्या पहिल्या बर्फवृष्टीनं काश्मिर, हिमाचलप्रदेशमध्ये सध्या हे असं नयनमनोहर दृष्य पहायला मिळतंय. डोंगर, झाडं, घरं ज्याठिकाणी नजर टाकाल त्याठिकाणी बर्फच बर्फ... काश्मिरच्या पटनी टॉप, नत्थाटॉप या पर्यटन स्थळांवर सगळीकडे बर्फाचं साम्राज्य पाहायला मिळचंय.

Dec 24, 2013, 06:22 PM IST

बुध ग्रहावर नासाला आढळला `बर्फ`

अमेरिकेच्या अंतराळ एजन्सी ‘नासा’च्या वैज्ञानिकांनी एक नवा खुलासा केलाय. बुध ग्रहावर ध्रुवाच्या जवळ बर्फ आणि त्यासारखे बाष्पीभवन होणारे पदार्थ आढळल्याचा दावा या वैज्ञानिकांनी केलाय.

Dec 1, 2012, 12:25 PM IST