www.24taas.com, वॉशिंग्टन
अमेरिकेच्या अंतराळ एजन्सी ‘नासा’च्या वैज्ञानिकांनी एक नवा खुलासा केलाय. बुध ग्रहावर ध्रुवाच्या जवळ बर्फ आणि त्यासारखे बाष्पीभवन होणारे पदार्थ आढळल्याचा दावा या वैज्ञानिकांनी केलाय.
‘सिन्हुआ’नं दिलेल्या बातमीनुसार, मर्क्युरी सरफेस, स्पेस एनव्हायरमेंन्ट, जिओकेमिस्ट्री आणि रेन्जिंग या अंतराळ यानांमधून मिळालेल्या माहितीतून नासाच्या वैज्ञानिकांनी हा दावा केलाय. २०११ मध्ये बुध ग्रहाच्या कक्षेजवळ पोहचल्यानंतर या यानांतून ही अभ्यासपूर्ण माहिती मिळतेय.
पृथ्वीसहित सौरमंडळातील इतर ग्रहांमध्येही पाणी आणि जैविक गोष्टी असल्याच्या शक्यतेला हे वैज्ञानिक पडताळून पाहत आहेत. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचे वैज्ञानिक डेव्हिड लॉरेन्स यांच्या म्हणण्यानुसार, ‘नवे आकडे बुध ग्रहावर बर्फ असल्याचे संकेत देत आहेत आणि हा बर्फ इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की संपूर्ण वॉशिग्टनमध्ये हा पसरवला गेला तरी त्याची जाडी दोन मैलांपेक्षाही जास्त असेल.
३ ऑगस्ट २००४ मध्ये ‘मेसेंजर’ या अंतराळ यानाला पहिल्यांदाच बुध ग्रहाच्या कक्षेत धाडण्यात आलं होतं.