सियाचीन: सियाचीनमधील बर्फाळ प्रदेशात मृत्यूमुखी पडलेल्या जवानाच्या मृतदेहाचे अवशेष तब्बल २१ वर्षांनी सापडले आहेत. सांगलीतील जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या हवालदार टी. व्ही. पाटील यांचा फेब्रुवारी १९९३ साली मृत्यू झाला होता.
पाटील फेब्रुवारी महिन्यात इतर जवानांसह सियाचीनमध्ये गस्त घालत असताना एका हिमदरीत पडले आणि बेपत्ता झाले. लष्करातर्फे अनेक वर्ष त्यांचा शोध घेण्यात आला, मात्र त्यांचा मृतदेह सापडला नाही. मात्र या आठवड्यात काही जवानांना गस्त घालत त्यांचे अवशेष सापडले. खिशातील कुटुंबियांची चिठ्ठी आणि वैद्यकीय प्रमाणपत्रामुळं त्यांची ओळख पटू शकली.
हेलिकॉप्टरमधून वाटण्यात येणारी फूड पॅकेट्स गोळा करताना ते हिमदरीत पडले, त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना पकडून वर ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि पाटील खोल दरीत कोसळले. पाटील यांचा लहान भाऊही १९८७ साली सियाचीनमध्ये बेपत्ता झाला होता, मात्र त्यांचा शोध अद्यापही लागलेला नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.