फ्री इंटरनेट

जिओचा फोन घेण्याआधी या ७ गोष्टी तुम्हाला माहिती हव्यात

रिलायन्स जिओचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जेव्हा जिओ फोन लॉन्च केला तेव्हापासूनच लोकांमध्ये या फोनबाबत उत्सूकता होती. जिओचा 1500 रुपयांचा फोन हा तीन वर्षानंतर तुम्हाला मोफत होणार आहे. कारण ३ वर्षानंतर तुम्हाला कंपनी पैसे परत करणार आहे.

Jul 26, 2017, 01:52 PM IST

खूशखबर ! जिओची ऑफर संपल्यानंतरही सुरु राहणार फ्री इंटरनेट

रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. जिओची फ्री ऑफर संपल्यानंतरही ग्राहकांना काळजी करण्याची गरज नाही. असं बोललं जातंय की, जिओची फ्री ऑफर संपल्यानंतरही फ्री ४जी डेटा मिळत राहणार आहे. जिओ युजर्सला एप्रिलपासून फोनवर मिळणारी ऑफऱ संपली आहे तर काही लोकांची संपणार आहे. ज्यांची ऑफर संपली त्यांनी धन धना धन ऑफर घेतली. यामध्ये ३ महिने फ्री सेवा होती. दुसरीकडे समर सरप्राईज ऑफर देखील युजर्ससाठी लॉन्च केली गेली होती. त्यांना सध्या काळजी करण्याची चिंता नाही. कारण तुमच्या नंबरवर ऑफर जरी संपली असेल तरी फ्री सर्विस सुरुच राहणार आहे.

Jul 23, 2017, 03:26 PM IST

'सरकारने सर्वांना मोफत इंटरनेट सुविधा द्यावी'

नेट न्यूट्रॅलिटीवरुन सुरु असलेल्या वादाला नंदन नीलकेणी यांनी आता वेगळंच वळण दिलंय. याबाबत त्यांनी सरकारने नागरिकांना मोफत इंटरनेट उपलब्ध करुन द्यावं असा सल्लाही दिलाय. सरकारच्या या निर्णयामुळे भेदभाव राहणार नाही. या योजनेसाठी सरकार युनिर्व्हसल ऑब्लिगेशन फंडाद्वारेही पैसे मिळवू शकते, असंही त्यांनी म्हटलंय. 

Jan 2, 2016, 03:47 PM IST

मायक्रोसॉफ्ट देणार फ्री इंटरनेट

मायक्रोसॉफ्ट इंडियाने देशातील इंटरनेट कनेक्टिव्हीटीला अधिक उत्तम बनविण्यासाठी भारत सरकारला एक प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावात कंपनी दुर्गम भागांना इंटरनेटशी जोडण्यासाठी आणि इंटरनेट सुविधेवरील खर्च कमी करण्यासंदर्भात उल्लेख केला आहे. दरम्यान, या संदर्भात सरकारकडून कोणतेही वक्तव्य आले नाही. पण सरकारची या प्रस्तावावर अनुकूल होण्याची शक्यता अधिक दिसत आहे. विशेष म्हणजे सरकारने नुकतेच डिजीटल इंडिया कॅम्पेन लॉन्च केले होते. त्यामुळे सरकार याबाबत सकारात्मक विचार करू शकते. 

Nov 13, 2014, 07:27 PM IST