जिओचा फोन घेण्याआधी या ७ गोष्टी तुम्हाला माहिती हव्यात

रिलायन्स जिओचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जेव्हा जिओ फोन लॉन्च केला तेव्हापासूनच लोकांमध्ये या फोनबाबत उत्सूकता होती. जिओचा 1500 रुपयांचा फोन हा तीन वर्षानंतर तुम्हाला मोफत होणार आहे. कारण ३ वर्षानंतर तुम्हाला कंपनी पैसे परत करणार आहे.

Updated: Jul 26, 2017, 01:52 PM IST
जिओचा फोन घेण्याआधी या ७ गोष्टी तुम्हाला माहिती हव्यात title=

मुंबई : रिलायन्स जिओचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जेव्हा जिओ फोन लॉन्च केला तेव्हापासूनच लोकांमध्ये या फोनबाबत उत्सूकता होती. जिओचा 1500 रुपयांचा फोन हा तीन वर्षानंतर तुम्हाला मोफत होणार आहे. कारण ३ वर्षानंतर तुम्हाला कंपनी पैसे परत करणार आहे.

जिओचा फोन घेण्याआधी काही गोष्टी जाणून घ्या.

१. जिओचा हा 4G फीचर फोन सिंगल सिम असणार आहे. यामध्ये एकच सिम काम करेल. जो फक्त जिओचा असेल.

२. यूजर्स यामध्ये एअरटेल, आयडिया, वोडाफोन या कंपनीचे सिम नाही वापरु शकणार. मग ते ४जी असले तरी.

३. जेव्हा हे फोन यूजर्सला दिले जातील तेव्हा तेव्हा तो ओपन आणि एम्प्टी डिवाईस असेल. म्हणजे तुम्हाला फक्त फोन मिळेल.

४. फोनमध्ये कोणतंही 2G किंवा 3G सिम नाही चालणार पण Jioचं जुनं सिम चालेल.

५. सोबतच कंपनीकडे दर आठवड्याला 50 लाख फोन डिलीवर करु शकेल ऐवढीच कुवत आहे. पण तुम्हाला कोठेही लाईन लावण्याची गरज नाही पडणार.

६. फोनची प्री-बुकिंग आहे. त्यामुळे जिओ स्टोर, ऑनलाईन किंवा अॅपवर जाऊन तुम्ही तो बूक करु शकता. फोन तुमच्या घरी येईल.

७. या फोनमध्ये सोशल अॅप व्हॉट्सअॅप नाही चालणार. कारण जिओ आपला वेगळा अॅप आणणार आहे.