फसवणूक

`एन मार्ट`ने घातला ग्राहकांना गंडा

मराठवाड्यात मल्टी लेव्हल मार्केटींग या गोंडस नावाखाली एन मार्ट नावाच्या कंपनीनं नागरिकांना 25 कोटींचा गंडा घातलाय.

Nov 6, 2012, 07:43 PM IST

लेडीज व्हर्सेस 'किरण देशपांडे'!

पुण्यात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. संगणक अभियंता म्हणवणाऱ्या युवकाने तीन मुलींना कोट्यावधींचा गंडा घातलाय. किरण देशपांडे असं त्याचं नाव आहे. लग्नाचं आमीष दाखवून त्यांनं तीन उच्चशिक्षित तरुणींकडून पैसे उकळले.

Nov 4, 2012, 10:01 PM IST

चीन निघालं चाणाक्ष, भारताची सडली द्राक्षं

भारत आणि चीनमध्ये सात वर्षांपूर्वी एक निर्यात करार झाला. त्यानुसार चीननं सफरचंद निर्यात करायची आणि भारतानं नाशिकची द्राक्षं निर्यात करायची असं ठरलं. या करारात चीननं चाणाक्षपणा दाखवला पण भारताचे प्रतिनिधी अपयशी ठरले. परिणामी चीनमधून सफरचंद येतात, पण भारताची द्राक्षं मात्र चीनमध्ये पोहोचू शकली नाहीत.... नक्की काय घडलं?

Oct 9, 2012, 06:29 PM IST

टार्गेट पूर्ण करण्यासाठी केली तरुणाला फसवून नसबंदी

आपले वर्षाचे टार्गेट पूर्ण करण्याकरिता चाकरमानी वेगवेगळी शक्कल लढवतात. मात्र एक परिचारिका कुठल्या स्तराला जाऊ शकते याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळालाय. देवरी तालुक्यातील भानोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात खोटी माहिती अर्जात भरून एका तरुणाची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Oct 8, 2012, 04:32 PM IST

वसंत पुरकेंची `बनवा बनवी`

विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरकेंनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचं उघड झालंय. मुंबईत आशीर्वाद सोसायटीत फ्लॅट असल्याचं पुरकेंनी नमूद केलं होतं. मात्र माहितीच्या अधिकारात पुरकेंची बनवाबनवी उघड झालीय.

Aug 30, 2012, 04:03 PM IST

२५ लाखांची फसवणूक करणाऱ्या इसमाला अटक

25 लाखांची फसवणूक करणाऱ्या एका इसमाला वसईच्या माणिकपूर पोलिसांनी एटक केली आहे. भगवानदास महादेव मेजवानी असं आरोपीचं नाव आहे.

Jul 10, 2012, 09:30 AM IST

रायगडमधील शेतकऱ्यांची फसवणूक

रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. एका व्यापाऱ्यानं जादा दराचं आमीष दाखवून शेतकऱ्यांकडून कोट्यवधींचं धान्य गोळा केलं. मात्र कुठलाही मोबदला न देता हा व्यापारी कुटुंबासह फरार झालाय. पोलिसांकडून काहीही कारवाई होत नसल्यानं शेतकरी संतापले आहेत.

Feb 29, 2012, 03:21 PM IST

वैद्यकीय क्षेत्रात दलालांचा सुळसुळाट

नाशिकच्या वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश देतो, असं सांगून बंगळुरुच्या एका डॉक्टरची फसवणूक करण्यात आली. त्याला तब्बल पंचावन्न लाखांचा गंडा घालण्यात आलाय.

Dec 14, 2011, 10:11 AM IST