www.24taas.com, मुंबई
विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरकेंनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचं उघड झालंय. मुंबईत आशीर्वाद सोसायटीत फ्लॅट असल्याचं पुरकेंनी नमूद केलं होतं. मात्र माहितीच्या अधिकारात पुरकेंची बनवाबनवी उघड झालीय.
अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत पुरकेना फ्लॅट वितरीत झाला नसल्याचं स्पष्ट केलंय. तसंच पुरकेंचं शपथपत्रही त्यांनी खोटं ठरवलंय. यवतमाळचे सामाजिक कार्यकर्ते भीमराव राठोड यांनी माहितीच्या अधिकारात ही बाब उघड केलीय.
इतकंच नव्हे तर वार्षीक उत्पन्न अडीच हजार रूपये दाखवून पुरकेंनी मुख्यमंत्री कोट्यातून दोन फ्लॅट आधीच लाटले आहेत. त्यांच्या पत्नीनंही मुख्यमंत्री कोट्यातून एका फ्लॅटची कमाई केलीय. भीमराव राठोड यांनी केलेल्या तक्रारीनंतर अँन्टी करप्शन ब्युरोचा ससेमिरा पुरकेंच्या मागे लागला आहे.