पाणी

पाण्यासाठी प्राण्यांची वणवण

दुष्काळाचे चटके माणसांबरोबरच प्राण्यांनाही बसू लागले आहेत. दुष्काळाने नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यात नागरिकांबरोबर भटकणारी हरणेही तहानली आहेत. कासावीस झालेल्या या हरणांचा विहिरीत पडून मृत्यू होत आहे.

Mar 17, 2013, 11:59 PM IST

विहिरींना पाणी न लागल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

महाराष्ट्रात भीषण दुष्काळ जाणवत आहे. या दुष्काळाला नागरिक त्रस्त झाले आहेत. हा दुष्काळ आता जीवावर उठला आहे. पाणी नसल्याने दोन विहिरी खोदूनही पाणी न लागल्यानं निराश झालेल्या औरंगाबादेतल्या एका शेतक-यानं आत्महत्या केलीये.

Mar 6, 2013, 12:27 PM IST

ही पाहा पाण्यावर चालणारी कार

`द क्वाडस्की` ही कार पुढील महिन्यात अमेरिकेत उपलब्ध होणार आहे. ही एक एंफिबियस गाडी असून, ती रस्त्यावर तसेच पाण्यातही पळू शकणार आहे.

Oct 17, 2012, 04:51 PM IST

`सहा महिन्यात शिक्षक नेमा; शाळेत सुविधा द्या`

देशभरातील सर्व शाळांमध्ये रिक्त जागांवरील असणारी शिक्षकांची पदे तात्काळ भरण्यात यावीत, असे आदेश केंद्र आणि राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने देताना पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहे या मूलभूत सुविधा सहा महिन्यांच्या आत उपलब्ध करून द्याव्यात, असे बजावले.

Oct 4, 2012, 10:05 AM IST

गाडी पाण्यात गेली वाहून... पाच मृत्यू

ओढ्याच्या पाण्यात क्वालिस गाडी वाहून गेल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडली आहे. यामध्ये सात जणांना जलसमाधी मिळाली आहे. तर तिघेजण सुखरुप बचावले.

Jul 4, 2012, 07:19 AM IST

सीना कोळेगाव धऱणाचे पाणी कोणाला?

सीना कोळेगाव धऱणाचं पाणी अन्य भागांना सोडू नये असे आदेश गुरुवारी हायकोर्टानंही दिलेत.उस्माबादमधल्या शेतक-यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं हा आदेश दिला.

Jun 1, 2012, 10:15 AM IST

मुंबईत पाण्यासाठी तोडफोड

मुंबईतही पाण्याचा प्रश्न पेटलाय. कुर्ल्यामध्ये पाणीटंचाईमुळे नागरिकांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिका ऑफिसमध्ये तोडफोड केली आहे.

May 12, 2012, 04:22 PM IST

भंडारा: जिद्दीने दुष्काळाला पाजलं 'पाणी'

महाराष्ट्राचा अवघ्या ग्रामीण भागाची पाण्यासाठी वणवण सुरु असताना भंडारा जिल्ह्यातील बीड सीतेपार या गावानं मात्र दुष्काळाचा यशस्वी सामना केलाय.

May 9, 2012, 07:24 PM IST

शिवसेनेने अभियंत्याला पाणी दाखवलं

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सीना कोळेगाव धरणातून सोलापूरला पाणी सोडायला उस्मानाबादकरांनी विरोध केलाय. सोलापूरमध्ये काँग्रेस आमदार दिलीप मानेंनी केलेल्या आंदोलनानंतर पाटबंधारे विभागानं पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पाणी सोडण्यासाठी आलेल्या अभियंत्यास शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पिटाळून लावले

May 9, 2012, 02:00 PM IST

ग्लासभर पाण्याने काय होते...

आपले आरोग्य उत्तम राहण्याठी नियमित पाणी पिणे गरजेचे आहे. सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी प्यायले तर पोट साफ राहते. त्यामुळे आपण फ्रेश राहतो.

Mar 28, 2012, 01:23 PM IST

नाशिककरांचे तोंडचे पाणी पळणार?

आंतरराष्ट्रीय जलदिनीच नाशिककरांना पाणीकपातीचे संकेत मिळालेत. गेल्या वर्षीपेक्षा निम्म्याहून कमी पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचा इशारा महापालिकेनं दिलाय. जलदिनी कपातीची घोषणा करणं पालिकेनं टाळलं असलं, तरी नाशिककरांना पाणीकपातीची टांगती तलवार दिसू लागली आहे.

Mar 26, 2012, 08:50 PM IST

मुंबई पालिकेचे बजेट, पाणी, वीज महाग?

मुंबई महापालिकेचा २०१२-१३ चा अर्थसंकल्प पालिका आयुक्त सुबोध कुमार स्थायी समितीत सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात पाणी आणि वीज महागण्याची शक्यता वर्तवण्यात येते.

Mar 20, 2012, 01:13 PM IST

ठाण्यात पाणी जातयं वाया....

गेल्या कित्येक महिन्यांपासून ठाणे महापालिकेच्या हद्दीत एक विचित्र चित्र पहायला मिळत आहे. ठाणे महापालिकेकडून आधिच पाणी पुरवठ्याचे तिन तेरा वाजले आहेत.

Dec 16, 2011, 12:46 PM IST

पाण्यासाठी जावे लागले जेलमध्ये

नाशिक जिल्ह्यातील येवला परिसरात पाण्यासाठी आंदोलन करणा-या 250 आंदोलकांना अटक करून नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आलंय.

Dec 2, 2011, 06:34 AM IST