www.24taas.com, मुंबई
आपले आरोग्य उत्तम राहण्याठी नियमित पाणी पिणे गरजेचे आहे. सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी प्यायले तर पोट साफ राहते. त्यामुळे आपण फ्रेश राहतो. पाणी किती प्यावे, कधी प्यावे आदी अनेक प्रश्न प्रत्येकाला पडत असतात. पण घाबरू नका. तुमच्यासाठी या काही टिप्स...
आपल्याला दिर्घकाळ निरोगी राहण्यासाठी पाण्याची गरज असते. पाणी पिण्यात जर तुम्ही कंजुशी करीत असाल तर ते चूकीचे आहे. शरीर निरोगी आणि त्वचा तजेलदार राहण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.
आपले स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी जशी व्यायामाची गरज असते तशी पाण्याची आवश्यकता आहे. पाण्याची पाणी पिल्याने पचनक्रिया योग्य पद्धतीने चालते. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाणी पिल्याने पोट साफ राहते. त्यामुळे दिवसभर तुम्ही ओके राहता.
पाणी हे एक उत्तम पेय आहे. पण काही लोकांना शंका आहेत. जेवण करताना पाणी प्यायला पाहिजे. काही लोक म्हणतात जेवण झाल्यानंतर पाणी प्यावे. परंतु आयुर्वेदाप्रमाणे जेवताना शक्यतो पाणी पिण्याचे टाळावे.
अन्न बराच वेळ पोटात राहिले तर शरीराल पोषण जास्त मिळेल. जर जेवताना जास्त पाणी प्यायले तर अन्न लगेच पोटात खाली जाईल, जर पाणी प्यायचेच असेल तर थोडे प्यावे आणि कोमट पाणी प्यावे.
फ्रिजमधील पाणी पिताना थोडीशी खबरदारी घ्यावी. खूप थंड पाणी घेऊ नये. पाण्यात ओवा टाकून ते उकळून घ्यावे. अन्न पचण्यासाठी हे पाणी मदत करते.
पाण्याचा काहीही अपाय नसला तरी जेवण करण्यापूर्वी अर्धा तास अगोदर किंवा जेवण केल्यानंतर एक तासाने पाणी प्यावे.