पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदींचा देशातील विद्यार्थ्यांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सकाळी ११ वाजता देशभरातील विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. हे भाषण दिल्लीच्या विज्ञान भवनात होणार आहे.

Sep 11, 2017, 11:02 AM IST

पंतप्रधान मोदींचा म्यानमारला मदतीचा हात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमार मधील राखीन प्रांतात होणा-या हिंसाचारावर चिंता व्यक्त केली आहे. या हिंसाचारात अनेक जणांचा मृत्यू झाला. भारत म्यानमारमधील शांतीसाठी हरएक प्रकारची मदत करेल, अशी ग्वाही नरेंद्र मोदी यांनी दिली.

Sep 7, 2017, 10:43 AM IST

पंतप्रधान मोदींनी म्यानमारमधल्या ऐतिहसिक पॅगोडाला दिली भेट

 पंतप्रधान नरेंद्र मोदी मान्यमार दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी रंगून मधल्या शेड्योंग पॅगोडामध्ये दाखल झाले आहे. म्यानमारमधल्या ऐतिहसिक महत्वाच्या पॅगोडाला मोदींनी भेट दिली. यानंतर ते म्यानमारमध्ये दुसऱ्या महायुद्धात शहीद झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहणार आहे.

Sep 7, 2017, 10:31 AM IST

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात महत्त्वाची भेट

जगभरातील चालू असलेल्या गोंधळाच्या दरम्यान ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यात स्वतंत्रपणे भेट झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली. उत्तर कोरियाच्या मुद्द्यावर जग दोन गटांमध्ये वाटलं जात असतांना पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती पुतीन यांची बैठक होत आहे. उत्तर कोरियावर हल्ल्यासाठी जपान, अमेरिकेसह इतर शक्तीशाली देश तयारी करत असतांना रशिया आणि चीन यांनी मात्र याला विरोध केला आहे.

Sep 4, 2017, 05:09 PM IST

पंतप्रधान मोदींच्या मंत्रीमंडळात हे 'नवरत्न'

पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रीमंडळ विस्तारात ९ नव्या मंत्र्यांचा समावेश झाला आहे. शिवप्रताप शुक्ल, अश्विनीकुमार चौबे, विरेंद्र कुमार, अनंतकुमार हेगडे, राजकुमार सिंग, हरदीपसिंग पुरी, सत्यपाल सिंग, गजेंद्रसिंह शेखावत, अल्फोन्स कन्ननथानम यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Sep 3, 2017, 12:11 PM IST

केंद्रीय मंत्रिमंडळाचा अल्पावधीतच विस्तार; इन-आऊट बद्धल उत्सुकता

होणार होणार म्हणून गेली अनेक दिवस चर्चेत असलेल्या केंद्रीय मंत्रिंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाल्याची चिन्हे आहेत. येत्या ३ सप्टेंबरला हा विस्तार होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा नेमका विस्तारच असेल की त्यात खांदेपालटही होईल याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

Aug 31, 2017, 05:45 PM IST

अखेर राम रहिम हिंसा प्रकरणावर बोलले पंतप्रधान मोदी

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहिम याच्या अटकेनंतर सध्या पंजाब, हरियाणासह रामरहीमचे समर्थक असलेल्या भागांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. सीबीआय कोर्टानं दोषी ठरवल्यानंतर हजारोंच्या संख्येत जमलेल्या बाबा राम रहिमच्या समर्थकांनी कोर्टाच्या आवारात मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली. यात ३६ जणांचा बळी गेलाय तर २५० हून अधिक जण जखमी झाले.

Aug 27, 2017, 11:34 AM IST

पंतप्रधान मोदींनी २०० तरुण सीईओंशी साधला संवाद

 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या २०० तरुण सीईओंशी नीती आयोगाच्या व्यासपीठावरून संवाद साधला. यावेळी बोलताना या तरुण सीईओंना मोदींनी देशाच्या आर्थिक प्रगतीचे सैनिक अशी उपमा दिली आहे. काळात देशाची आर्थिक प्रगती साधायची असेल, तर त्यासाठी चळवळ उभी करायाला हवी, असंही पंतप्रधानांनी यावेळी म्हटलं.  

Aug 23, 2017, 10:33 AM IST

तीन तलाकच्या निर्णयावर बोलले पंतप्रधान मोदी आणि अमित शाह

संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या तीन तलाक प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. तीन तलाकवर आजपासून बंदी घालून, सरकारने सहा महिन्यात कायदा करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिला आहे. या निर्णयानंतर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

Aug 22, 2017, 03:56 PM IST

मोदींनी एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही : राहुल गांधी

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी आज मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं.  गेल्या तीन वर्षात मोदी सरकारनं आजपर्यंत एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही, असा राहुल गांधींनी आरोप केला. 

Aug 17, 2017, 10:01 PM IST

चीनसोबत तणाव असतांना पंतप्रधान मोदी करणार म्यानमारचा दौरा

चीनसोबत वाढत असलेला तणाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या महिन्यात म्यांमारचा दौरा करणार आहेत. ६ आणि ७ सप्टेंबरला मोदी म्यांमार दौरा करणार आहेत. मोदींचा हा दौरा महत्त्वपूर्ण असणार आहे.

Aug 17, 2017, 11:43 AM IST

पंतप्रधान मोदींचा यंदाचा फेटा होता वेगळा आणि खास

अनेक खास कार्यक्रमांमध्ये आपल्या पोशाखामुळे चर्चेत असणारे मोदी यावेळेस देखील स्‍वातंत्र्य दिना दिवशी पुन्हा चर्चेत आहेत. मोदींचा कुर्ता अनेकांना आकर्षित तर करतोच पण पंतप्रधान मोदींचा फेटा देखील वेगवेगळा असतो. पंतप्रधान मोदींच्या यंदा चौथ्यांदा एका वेगळ्या प्रकारचा फेटा घातला होता. यावेळेस पंतप्रधान मोदींचा फेटा हा लांब होता. मागच्या बाजुला सोडण्यात येणारा फेटा हा त्यांच्या घुडघ्यापर्यंत होता. देशातील विविध भागामध्ये फेट्याला गरीबांच्या शानचं प्रतिक मानलं जातं.

Aug 15, 2017, 12:06 PM IST

पंतप्रधान मोदींनी खासदारांना सुनावलं, '२०१९ मध्ये बघतो'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदीय दलाच्या बैठकीत लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची चांगलीच परीक्षा घेतली. पीएम मोदींनी संसदेत गैरहजर राहणाऱ्या खासदारांना चांगलंच सुनावलं. त्यांनी म्हटलं की तुम्ही आणि मी काहीही नाही आहोत. सर्व काही पक्ष आहे.

Aug 10, 2017, 01:38 PM IST

पंतप्रधान मोदींचं माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना भावूक पत्र

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हे काही दिवसांपूर्वी पदमुक्त झाले. त्यांनी आज ट्विटरवर पंतप्रधान मोदींनी त्यांनी लिहिलेलं पत्र शेअर केलं. त्यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलेलं पत्र मनाला भावणारं आहे. 'राष्ट्रपती कार्यालयातील माझ्या शेवटच्या दिवशी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे पत्र दिलं आहे. हे पत्र माझ्या मनाला भावलं आहे. आता ते मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करतो. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पत्रात प्रणव मुखर्जी यांना प्रेरणा स्त्रोत म्हंटलं आहे. 

Aug 3, 2017, 04:42 PM IST