पंतप्रधान कार्यालय

पुणे मेट्रोला पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी

पुणे मेट्रोला पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी

Dec 7, 2016, 03:02 PM IST

पुणे मेट्रोला पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी, मोदी करणार भूमीपूजन

पुण्यातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाला आज पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी मिळालीय. त्यामुळे उद्या (बुधवारी) हा विषय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम मंजुरीसाठी येणार आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर मेट्रो प्रकल्प खर्या अर्थानं रुळावर येणार आहे. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी ही  माहिती दिलीय.  

Dec 6, 2016, 09:36 PM IST

पालिकेनं काम केलं नाही, पंतप्रधानांना धाडलं पत्र... काम फत्ते!

कोपरगाव येथील जिजाऊ कॉलीनीच्या रहिवाशांनी बंदिस्त गटारीसाठी नगरपालिकेकडे सतत पाठपुरावा करून देखील काम होत नसल्याने अखेर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाला मेल पाठवला आणि एका साध्या मेलची दखल घेत केंद्राने राज्याला तर राज्य सरकारने कोपरगाव नगरपालिकेला सदर ड्रेनेज लाईनच काम मार्गी लावण्यास भाग पाडलं.

Sep 11, 2016, 10:01 PM IST

संसद भवनाच्या सुरक्षेमध्ये घोडचूक

संसद भवनाच्या सुरक्षेमधली घोडचूक समोर आली आहे. प्रदीप कुमार नावाची एक व्यक्ती संसद भवनामध्ये पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

Mar 11, 2016, 04:05 PM IST

वडिलांच्या उपचारासाठी चिमुरड्यांचं मोदींना पत्र...

कानपूर : कानपूरमधील दोन चिमुरड्यांच्या मदतीसाठी पंतप्रधानांचं कार्यालय देवदूताप्रमाणे धावून आलंय. 

Mar 3, 2016, 04:34 PM IST

पंतप्रधानांच्या खिशात फक्त 4700 रुपये, तर एक कोटी रुपयांची संपत्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खिशात फक्त 4,700 रुपये आहेत. पंतप्रधान कार्यालयानंच मोदींच्या संपत्तीची घोषणा केली आहे. 

Feb 1, 2016, 06:02 PM IST

मोदी कार्यालयाने अडवला महाराष्ट्राचा चित्ररथ

यंदा प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. तुम्ही सातत्यानं सहभागी होताय, यंदा इतर राज्यांना सहभागी होऊ द्या असं कारण सांगत पंतप्रधान कार्यालयानं महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारला.

Dec 16, 2015, 03:20 PM IST

मोदींनी नाकारली केजरीवाल यांना भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेट नाकारली आहे. ही भेट नाकारण्यामागे व्यस्तता हे कारण देण्यात आले आहे.

Jun 30, 2015, 11:04 AM IST

पंतप्रधानांना थेट करा ई-मेल...

'पीएमओ' अर्थात पंतप्रधान कार्यालयाची वेबसाईट आता एका नव्या लूकमध्ये दिसणार आहे. तसंच ही वेबसाईट वापरणाऱ्यांना याचा वापर करण्यासाठीही सोप्पं होईल.

May 28, 2015, 05:02 PM IST

श्रीकर परदेशींची पीएमओमध्ये उपसचिवपदी नियुक्ती

महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची बातमी... राज्यातील कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळख असलेले आयएएस अधिकारी श्रीकर परदेशी यांची पीएमओमध्ये उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आलीय. पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधाकामावर हातोडा चालवणारे परदेशी 'बुलडोजर मॅन' म्हणूनही ओळखले जातात.

Apr 1, 2015, 11:03 AM IST

पंतप्रधान कार्यालयात इंटरनेटचा स्पीड किती आहे, माहीत आहे?

दिल्लीतलं पंतप्रधान कार्यालय आता सुपरफास्ट होणार आहे... अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही... कारण, पीएओचा इंटरनेट स्पीड समजला तर तुमची तोंडात बोटं घालण्याची वेळ येईल. 

Oct 28, 2014, 03:03 PM IST

वाराणसीत असणार मोदींच ‘मिनी पीएमओ’

देशाचे पुढील पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदींच्या लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीची ओळख आगामी काळात सर्वात शक्तीशाली शहर म्हणून होणार आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारचा विकास झाला तर ती महाराष्ट्रासाठी खुशखबर असणार आहे. पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मोदी दिल्ली प्रमाणे आपल्या मतदारसंघाला ‘मिनी पीएमओ’ बनवू शकतात. हे मिनी पंतप्रधान कार्यालय वाराणसीसाठी मोदींच्या प्लॅनला मूर्त रूप देऊ शकते.

May 19, 2014, 09:04 PM IST

डॉ. मनमोहन सिंग यांचे मंत्रिमंडळातल्या सदस्यांसाठी चहापान

लोकसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर आल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या कर्मचा-यांचा निरोप घेतला. शनिवारी पंतप्रधान मंत्रिमंडळातल्या सर्व सदस्यांसाठी चहापान आयोजित करणार आहेत.

May 14, 2014, 09:35 AM IST

सचिन तेंडुलकरला `भारतरत्न` जाहीर!

सर्वांचा लाडका सचिन तेंडुलकर आता ‘भारतरत्न सचिन तेंडुलकर’ होतोय. सचिनला ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर झालाय. देशाचा सर्वोच्च सन्मान मिळवणारा सचिन पहिला खेळाडू ठरलाय. सचिन तेंडुलकरला भारतरत्न देणं ही खुद्द सचिन तेंडुलकर प्रमाणंच त्याच्या चाहत्यांसाठीही एक सरप्राईज गिफ्ट असल्याचं मानलं जातंय.

Nov 16, 2013, 04:21 PM IST