पंतप्रधानांच्या खिशात फक्त 4700 रुपये, तर एक कोटी रुपयांची संपत्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खिशात फक्त 4,700 रुपये आहेत. पंतप्रधान कार्यालयानंच मोदींच्या संपत्तीची घोषणा केली आहे. 

Updated: Feb 1, 2016, 06:43 PM IST
पंतप्रधानांच्या खिशात फक्त 4700 रुपये, तर एक कोटी रुपयांची संपत्ती title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खिशात फक्त 4,700 रुपये आहेत. पंतप्रधान कार्यालयानंच मोदींच्या संपत्तीची घोषणा केली आहे.  या आधी 18 ऑगस्ट 2014 ला पंतप्रधान कार्यालयानं मोदींच्या संपत्तीची घोषणा केली होती, तेव्हा मोदींच्या खिशात 38,700 रुपये होते. 
पंतप्रधान कार्यालयानं मोदींच्या एकूण संपत्तीचीही माहिती दिली आहे. यानुसार पंतप्रधानांकडे सध्या 1 कोटी 41 लाख रुपयांची संपत्ती आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर ही माहिती देण्यात आली आहे, तसंच ही माहिती 30 जानेवारी 2016 पर्यंतची असल्याचंही या वेबसाईटवर सांगण्यात आलं आहे. 

मोदींनी कुठे केली गुंतवणूक 
पंतप्रधानांनी एल अँड टी इन्फ्रा या बॉन्डमध्ये 20 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये मोदींनी 5.45 लाख रुपये गुंतवले आहेत. पंतप्रधानांनी 1.99 लाख रुपयांचा इन्शुरन्सही काढला आहे. त्यामुळे मोदींकडे 41.15 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. 

तर गांधीनगरमध्ये मोदींची निवासी मालमत्ता आहे, ज्यात त्यांचा 3,531.45 स्क्वेअर फूट इतका वाटा आहे, ज्याचा बिल्ट अप एरिया आहे 169.81 स्क्वेअर फूट. पंतप्रधानांकडे असलेली ही निवासी मालमत्ता वारसा हक्कानं मिळालेली नाही. ही जागा मोदींनी 25 ऑक्टोबर 2002 ला विकत घेतली होती. 1,30,488 रुपयांना त्यांनी ही जागा विकत घेतली, तर जमिनीवर बांधकाम केल्यानंतर ही जागा 2,47,208 रुपयांची झाल्याचं पंतप्रधान कार्यालयानं स्पष्ट केलं आहे.