नोटबंदी

नोटबंदी : पैशासाठी आयसीआयसीआय बँकेची 'बँक ऑन व्हील' सेवा

नोटबंदीमुळे रोख रक्कम काढण्याकरता, बँक आणि एटीएमबाहेर लांब रांगा लागत असल्याचं चित्र सगळीकडेच पाहायला मिळतंय. ग्रामीण भागात ही स्थिती जास्तच चिंताजनक आहे. यावर आयसीआयसीआय बँकेनं बँक ऑन व्हील ही नावीन्यपूर्ण योजना आणली आहे.

Dec 9, 2016, 10:24 PM IST

नोटबंदीचा विडी उद्योगाला फटका, मजुरांना अजूनही पगार नाही

नोटबंदीचा फटका सोलापुरातील 70 हजार विडी कामगार महिलांना बसला आहे.

Dec 9, 2016, 10:07 PM IST

अॅक्सिस बँकेत 44 बनावट खात्यात 100 कोटी रुपये

नोटाबंदीनंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेकांनी चक्क बनावट नावाने बॅंक खाते काढलीत. चक्क अॅक्सिस बँकेत 44 बनावट खात्यात 100 कोटी जमा झाल्याचे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारल्यानंतर ही बाब उघड झाली.

Dec 9, 2016, 10:05 PM IST

सोन्यानं गाठला दहा महिन्यांचा नीचांक

सोन्याच्या भावानं दहा महिन्यांचा नीच्चांक गाठला आहे.

Dec 9, 2016, 04:52 PM IST

पैसे देण्यासाठी बँकांची आडकाठी का?

बँकांमधून 24 हजार काढण्याची मुभा असताना रक्कम देण्यासाठी बँकांकडून आडकाठी का करण्यात येतेय असा सवाल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारला आहे. 

Dec 9, 2016, 04:34 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांनी डेबिट कार्ड बाळगणे अनिवार्य

नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस अर्थवस्थेला चालना देण्यासाठी मध्यप्रदेश सरकार सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना डेबिट कार्ड बाळगणे अनिवार्य करणार आहे. बँकांच्या माध्यमातून डेबिट कार्ड वापराचे प्रशिक्षण सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.

Dec 8, 2016, 09:06 PM IST

संशयीत दहशतवाद्यांकडून बँकेत १० लाखाचा दरोडा

श्रीनगर: दक्षिण कश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील काही अज्ञात संशयित दहशतवाद्यांनी गुरूवारी एका बँकेत दरोडा टाकून १० लाखाची रोकड पळवली.

बँक कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांना चकवा देऊन आरोपी पसार झाले आहेत. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची तपास मोहिम चालू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Dec 8, 2016, 08:52 PM IST

एलआयसी-जीआयसीच्या डिजीटल पेमेंटवर मोठी सूट

नोटबंदी निर्णयाच्या एका महिन्यानंतर मोदी सरकारनं नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

Dec 8, 2016, 06:07 PM IST