नाव घेतलं तरी चिडतो 'मिस्टर परफेक्शनिस्ट!' आमिर खानच्या करिअरचा सर्वात फालतू चित्रपट

Aamir Khan's Flop Movie : आमिर खानच्या करिअरमधील सगळ्यात फ्लॉप चित्रपट माहितीये? त्याचं नाव ऐकलं तरी आमिरला येते चिड

दिक्षा पाटील | Updated: Nov 11, 2024, 01:21 PM IST
नाव घेतलं तरी चिडतो 'मिस्टर परफेक्शनिस्ट!' आमिर खानच्या करिअरचा सर्वात फालतू चित्रपट title=
(Photo Credit : Social Media)

Aamir Khan's Flop Movie : बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्ट किंवा परफेक्शनिस्ट म्हटल्यावर किंवा वाचल्यावर सगळ्यांच्या नजरेसमोर एकच व्यक्ती येते आणि ती म्हणजे अभिनेता आमिर खान. आमिर खान एकामागे एक असे ब्लॉकबस्टर चित्रपट देताना दिसतोय. अर्थात अनेकदा आमिर आणि हिट, सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर हे शब्द एकत्र येतात असं म्हटलं जातं. पण तुम्हाला माहितीये का की आमिर खानच्या करिअरमध्ये असा एक चित्रपट आहे जो सगळ्यात मोठा फ्लॉप ठरला होता. हे फक्त प्रेक्षकांनी नाही तर स्वत: आमिर खाननं देखील मान्य केलं आहे. इतकंच नाही तर त्यानं या चित्रपटाला त्याची सगळ्यात मोठी चूक म्हटलं आहे. आता हा चित्रपट कोणता आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्याविषयी आज जाणून घेऊया. 

2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं नाव जरी घेतलं तरी देखील आमिरला राग येतो असं म्हणतात. अजूनही तुमच्या लक्षात आलं नाही का? या चित्रपटाचं नाव 'मेला' आहे. या चित्रपटात आमिर शिवाय ट्विंकल खन्ना, आमिरचा भाऊ फैजल खान, टीनू वर्मा, जॉनी लीवर आणि टीकू तलसानिया यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचं बजेट हे 18 कोटी आहे. पण चित्रपटानं या बॉक्स ऑफिसवर फक्त 25 कोटींची कमाई केली. त्यामुळे हा चित्रपट पैशांच्या बाबतीत हिट तर ठरला पण प्रेक्षकांच्या मनात हा जागा करु शकला नव्हता. 

IMdb नुसार मेला हा आमिर खानचा आजवरचा सगळ्यात खराब चित्रपट आहे आणि त्यानं स्वत: सांगितलं की हा चित्रपट त्याच्या करिअरमधील सगळ्यात मोठी चूक आहे. आमिरनं या चित्रपटाविषयी बोलताना सांगितलं होतं की त्याला जसा हवा तसा हा चित्रपट नव्हता आणि दिग्दर्शक धर्मेश दर्शनसोबत अनेक गोष्टींवर त्याचे मतभेद होते. आमिरनं सांगितलं की यामुळे अनेक दिवस तो इतका चिंतेत होता की त्यानं कोणताही चित्रपट करण्यास नकार देत होता. त्यानंतर जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यानंतर जी प्रतिक्रिया आली त्यानं तो निराश झाला होता. 

हेही वाचा : सलमान, शाहरुखनंतर मिथुन चक्रवर्तींना मिळाली धमकी; पाकिस्तानी डॉननं 10-15 दिवसात दिला माफी मागण्याचा सल्ला

इतकंच नाही तर अनिल कपूर आणि राणी मुखर्जीप्रमाणे जेव्हा केव्हा या चित्रपटाचं नाव घेतलं जायचं तेव्हा तो शांत व्हायचा आणि त्याला खूप दु:ख व्हायचं. रिपोर्ट्सनुसार, ट्विंकल खन्नानं या चित्रपटाला रिजेक्ट केलं होतं. या चित्रपटाआधीच अक्षय कुमारनं ट्विंकल खन्नाला लग्नासाठी विचारना केली आणि तिनं आधी अक्षयला नकार दिला कारण तिला करिअरवर लक्ष केंद्रित करायचं होतं. पण त्यानंतर त्यानं सांगितलं की चित्रपट जर बॉक्स ऑफिसवर हिट झाला नाही तर तिनं अक्षयला लग्नासाठी होकर दिला.