नवी दिल्ली : बँकांमधून 24 हजार काढण्याची मुभा असताना रक्कम देण्यासाठी बँकांकडून आडकाठी का करण्यात येतेय असा सवाल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारला आहे.
नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असल्याचा दावा करत सुप्रीम कोर्टात काही याचिका दाखल करण्यात आल्यात. या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी सुरु आहे. यावेळी कोर्टानं सरकारला रक्कमेची मर्यादा वाढवण्याबाबत विचारलं.
प्रत्येकाला नवीन नोटा मिळाव्यात यासाठी मर्यादेचे बंधन घालण्यात आल्याचे सरकारने कोर्टात सांगितलंय.. तसंच सरकार हातावर हात ठेवून बसले नसून येत्या 10 ते 15 दिवसांत सर्व समस्या सुटतील आणि सुरळीत होईल असा दावा सरकारने कोर्टात केला आहे.