नवी दिल्ली : नोटबंदी निर्णयाच्या एका महिन्यानंतर मोदी सरकारनं नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कॅशलेस व्यवहारासाठी डिजीटल पेमेंटचा वापर करणाऱ्यांना मोठी सूट द्यायचा निर्णय सरकारनं घेतला आहे. अर्थमंत्री अरुण जेटलींनी पत्रकार परिषदेमध्ये याची माहिती दिली आहे.
एलआयसीचा हफ्ता हा ऑनलाईन भरला तर ग्राहकांना आठ टक्के सूट मिळणार आहे, तर जीआयसीचा हफ्ता ऑनलाईन भरल्यास तब्बल 10 टक्के सूट मिळेल, असं अरुण जेटलींनी सांगितलं आहे.
- टोलनाक्यांवर ऑनलाइन टोल भरणाऱ्यांना 10 टक्के सवलत
- डिजिटल माध्यमातून पेट्रोल खरेदी करणाऱ्यांना 0.75 टक्के सवलत
- नाबार्डच्या माध्यमातून ग्रामीण आणि सहकारी बॅंकांचे खातेदार असलेल्या आणि - - - किसान कार्ड असलेल्या शेतकऱ्यांना रूपी कार्ड देणार
- रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेची तिकिटे आणि पास डिजिटल माध्यमातून खरेदी केल्यास मिळणार 0.5 टक्के सवलत
- 2000 रुपयांपर्यंतच्या ऑनलाईन व्यवहारांवर कोणताही सर्व्हिस चार्ज नाही