दूध

'आरे'चा गळा आवळला जातोय...

एकेकाळी सर्व मुंबईकरांची दुधाची गरज भागवणारी आरे डेअरी सध्या शेवटच्या घटका मोजताना दिसतेय. सरकारी नियमांमुळं बाजारभावानुसार दूध खरेदी करणं आरे डेअरीला शक्य नसल्यानं दिवसेंदिवस आरेकडील दूध संकलन कमी होत चाललंय. त्यामुळं गेली पाच दशकांपासून असलेल्या ग्राहकांना दूध पुरवठा करणं आरेला शक्य होत नाही.

Jul 1, 2014, 10:59 PM IST

…आणि रस्ता दुधानं धुवून निघाला!

 पूर्व दिल्लीमध्ये राष्ट्रीय महामार्ग NH 24 वर बुधवारी सकाळी रस्त्यावरच दुधाचे पाट वाहू लागले... मदर डेअरीचा एक दूधानं भरलेला टँकर रस्त्यावरच उलटल्यानं संपूर्ण रस्ताभर दूध पसरलेलं दिसलं.

Jun 25, 2014, 03:45 PM IST

उन्हाळ्यात आरोग्याचे सर्वात मोठे हत्यारः दही

दुधापासून तयार होणारे दही हे रुचकर आणि आरोग्यवर्धक माध्यम आहे. दहीमध्ये चांगल्या प्रतीचे बॅक्टेरिया असतात, ते शरीराला लाभदायक असतात.

Apr 28, 2014, 06:45 PM IST

एटीएममध्ये आता मिळणार २४ तास दूध!

एटीएममधून आतापर्यंत आपण केवळ पैसे काढले आहेत. आता एटीएममधून दूध मिळणार.... तुम्हांला आश्चर्य वाटत असेल, पण हे खरं आहे. गुजरातच्या आणंदमध्ये अमूल डेअरीने एनी टाइम मिल्क (एटीएम) मशीन लावले आहे.

Jan 27, 2014, 09:20 PM IST

राज्यात पुन्हा दूध २ रूपयांनी महागले

महिन्याभरात दुधाच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. गायीच्या आणि म्हशीच्या दुधात लीटरमागे दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात ही दरवाढ लागू असेल असं दूध उत्पादक संघानं स्पष्ट केल आहे.

Dec 18, 2013, 08:55 PM IST

गोरेपणाचा मोह सोडा, तुम्ही सावळेच बरे!

तुम्ही सावळे असाल तर मग चांगलीच गोष्ट आहे, हे आम्ही नाही सांगत तर वैद्यकीयदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे. वैद्यकीयदृष्ट्या सर्वात निरोगी त्वचा ही गव्हाळ किवा सावळ्या रंगाच्या व्यक्तीची असते. कारण यात मॅलनीन या रंगाद्रव्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे सूर्यप्रकाशात अतिनील किरणांपासून संरक्षणही होते. जर तुम्ही सावळे असाल तर उत्तम आहे.

Dec 7, 2013, 03:05 PM IST

दूध भेसळ कराल तर....सर्वोच्च न्यायालयाची कडक भूमिका

दूध भेसळीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं कडक भूमिका घेतली आहे. सर्व राज्यांनी दूध भेसळ रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, असा प्रश्न सुप्रीम कोर्टानं राज्यांना विचारला आहे.

Dec 5, 2013, 05:39 PM IST

राज्यात पुन्हा एकदा दूध महागलं

राज्यात पुन्हा एकदा दूध महागलं आहे. गाय आणि म्हैशीच्या दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लिटरमागे आता दोन रूपये जादा मोजावे लागणार आहेत.

Nov 22, 2013, 11:21 PM IST

दूध संघांना हवी राज्य सरकारची मदत

सहकारी दूध संघ सध्या तोटा सहन करुन दुधाची विक्री करत आहेत. दूध विक्री दरात वाढ करुन जनतेचा रोष पत्करण्याऐवजी राज्य सरकारने सहकारी दूध संघांना मदत देण्याची मागणी करण्यात येतंय.

Sep 22, 2013, 07:45 PM IST

दुधाचे दर ३ रुपयांनी वाढणार!

गेल्या महिन्यात सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे जनता खुश झाली होती. तसंच पेट्रोलचे भावही कमी झाल्याचंही समाधानही जनतेला मिळालं होतं. मात्र दुष्काळामुळे आता दुधाचे दर वाढणार आहेत.

May 5, 2013, 07:12 PM IST

पाण्यानंतर आता दुधाची टंचाई!

सांगली जिल्ह्यातील तीव्र दुष्काळाचा परिणाम पशुधनावर झाला आहे. चारा छावण्यांमुळे पशुधन काही प्रमाणात तगले असले, तरी दुध संकलनात मोठी घट झाली आहे. जिल्ह्यातील दुध संकलन तीन महिन्यात एक लाख लिटरने घटले आहे. मागील एका महिन्यातच 50 हजार लिटरनं दुध संकलन कमी झालं आहे.

Mar 24, 2013, 05:02 PM IST

दूध आणि दही ने हाडे होतात मजबुत

नव्याने केलेल्या अभ्यासानुसार दूध आणि दहीमुळे हाडे मजबुत होतात हे स्पष्ट झालेय. कमी फॅक्टचे दूध आणि दही या पदार्थामुळे प्रोटीन, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी वाढण्यास मदत होते.

Feb 4, 2013, 01:50 PM IST

दूध प्या लहानपणी, फायदा त्याचा म्हातारपणी

शक्ती आणि बुद्धीसाठी दूध प्यावं असं लहानपणापासून आपण ऐकत असतो. अनेकवेळा आपल्याला दूध पिणं आवडत नसूनही लहानपणी जबरदस्तीने दूध प्यावं लागलं असेल. पण आता नव्या संशोधनातून आपल्या या भारतीय पारंपरिक मान्यतेला दुजोरा मिळाला आहे.

Nov 8, 2012, 05:21 PM IST