दिवाळी

दुनिया वही, सोच नई....(अनुभव)

परवा लोकल पकडली रात्री 11.28ची परळहून... आधीच उशीर झाल्यानं आलेला कंटाळा, त्यात नशिबाने गाडीला गर्दी कमी... बसल्या बसल्या डोळा लागला... ठाण्याच्या आधी जाग आली ती गाडीत चित्रांची पुस्तक विकायला येणा-या एका मुलाच्या आवाजानं..20 रुपयाला एक असं ते चित्रांचं पुस्तक तो विकत होता.. 50 रुपयांना 3 पुस्तक देणार, असंही सांगत होता..

Nov 1, 2013, 04:57 PM IST

आदिवासी : ऐकलं नाही असं काही...

दसरा-दिवाळी हे जोडशब्द एक वेगळाच उत्साह घेऊन येतात. दसऱ्यापेक्षाही दिवाळी हा अधिक मोठा आनंदोत्सव. अपवाद बहुदा जव्हार-मोखाड्याच्या आदिवासींचाच... कारण तिथं जास्त महत्त्व असतं ते दस-याला. जव्हार ही देशातल्या पहिल्या आदिवासी संस्थानाची राजधानी. दस-याला आपल्या राजाला सोनं द्यायला यायची गेल्या शेकडो वर्षांची परंपरा हे आदिवासी बांधव आजही पाळतायत.

Nov 1, 2013, 03:11 PM IST

उठा उठा सकळीक, दिवाळी आली!

दिवाळी सण हा प्रकाशाचा, आनंदाचा, उत्साहाचा आणि जल्लोषाचा. दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशीचा. याला अनेक ठिकाणी `धनतरस` असंही म्हटलं जातं. दीपावलीच्या दिवशी लोक धनाची म्हणजेच लक्ष्मीची पूजा करतात. ताम्हणात वाटी किंवा पाटावर नाणी ठेवून त्याची हळद-कुंकू वाहून ही पूजा केली जाते. धणे, गूळ एकत्र करून त्याचा प्रसाद वाटला जातो.

Nov 1, 2013, 08:41 AM IST

दिवाळीत विकला जातोय भेसळयुक्त खवा

दिवाळी म्हटली की खमंग फराळ आणि गोडधोड मिठाई आलीच. परंतु आपण जी मिठाई खातोय, ती किती शुद्ध आहे याचा कधी विचार केलाय... केला नसेल तर निदान आता तरी नक्कीच करा. कारण बाजारात विकल्या जाणा-या खव्याच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

Oct 31, 2013, 06:50 PM IST

पहिल्यांदाच अमेरिकेच्या संसदेत दिवाळी!

अमेरिकेच्या राजकारणाचं केंद्र असलेल्या कॅपिटॉल हिल्सवर यंदा प्रथमच दिवाळीची आतषबाजी बघायला मिळाली. याबाबत अमेरिकन सिनेट आणि काँग्रेसमध्ये द्विपक्षीय ठराव एकमतानं संमत केल्या नंतर कॅपिटॉल हिल इथं पहिल्यांदाच दिवाळी साजरी करण्याचा कार्यक्रम झाला.

Oct 31, 2013, 03:53 PM IST

सावधान, दिवाळीत काजू घ्याल तर फसाल!

दिवाळी जसजशी जवळ येतेय तशी बाजारपेठा फुलू लागल्या आहेत.. आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्या आणि नव्या कपड्यांच्या खरेदीला उधाण आले आहे. मात्र, या दिवाळीनिमित्ताने अनेक बनावट पदार्थ बाजारात आले आहेत. त्यापासून तुम्ही सावधान राहिले पाहिजे. नाही तर ते तुमच्या जीवावर बेतू शकते. मिठाई, दुध याची भेसळ अनेक ठिकाणी दिसत आहे. आता तर अॅसिडयुक्त काजू बाजारात आले आहेत. त्यामुळे काजू घेताना सावधगिरी बाळगा.

Oct 31, 2013, 11:14 AM IST

दिवाळीचं काऊंटडाऊन सुरू... किल्ले झाले सज्ज!

दिवाळीत किल्ला बनविणे हे लहानग्यांचे आवडीचे काम... मातीत खेळत धमाल मस्ती करत दिवाळीच्या आधी किल्ले तयार व्हावेत यासाठी बालचमुची धडपड सध्या सगळीकडचं सुरु आहे. अशीच धडपत सध्या कोल्हापूर शहरातील पेठा पेठात पहायला मिळत आहे. धगधगत्या इतीहासाची साक्ष देणाऱ्या शिवरायांचे रायगड, प्रतापगड, रागंणा,पन्हाळगड असे अनेक किल्ले लवकर उभे राहावते यासाठी सगळे मावळे कामाला लागले आहेत.

Oct 31, 2013, 09:05 AM IST

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी `काळी दिवाळी`?

देशात दिवाळीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आलीय.

Oct 30, 2013, 06:33 PM IST

दिवाळीत अतिरेकी हल्ल्याची शक्यता, सुरक्षेत वाढ

बिहारमधील पाटणा येथील अतिरेकी हल्ल्यानंतर राज्यात अतिदक्षतेचा आदेश देण्यात आला आहे. दिवाळीच्या सणात हल्ल्याची शक्यता असल्याने मुंबईसह अन्य शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

Oct 30, 2013, 02:06 PM IST

संजय दत्त पुन्हा जेलमध्ये, दिवाळी येरवड्यातच

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी आणि चित्रपट अभिनेता संजय दत्त आज येरवडा जेलमध्ये जाण्यासाठी रवाना झाला आहे. संजय २८ दिवसांच्या संचित रजा म्हणजेच पॅरोलवर होता.

Oct 30, 2013, 08:09 AM IST

सोनसाखळी चोरांची `दिवाळी`!

पुण्यात सोनसाखळी चोरांची दिवाळी पूर्वीच दिवाळी सुरु झालीय. अवघ्या दीड तासात ७ सोनसाखळ्या हिसकावण्याच्या घटना शहरात आज घडल्या आहेत.

Oct 29, 2013, 10:24 PM IST

दिवाळी झोकात, चक्क रिक्षाचालकांना बोनस...तोही ४१ हजारांचा

रिक्षा चालकांनाही बोनस मिळालाय. ऐकून आश्चर्य वाटलं ना. पण हे खरं आहे. बदलापुरातील २५६ रिक्षाचालकांना तब्बल चौदा लाख ८२ हजार रूपये संघटनेच्यावतीने बोनसरुपात देण्यात आले.

Oct 29, 2013, 09:25 AM IST

दिवाळीत सोनं खरेदीचा बेत? खिसा भरलेला ठेवा...

यंदाच्या दिवाळीत सोन्याची वस्तू किंवा दागिने विकत घेण्याचा प्लान करत असाल, तर तुमच्या खिशाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.

Oct 28, 2013, 04:07 PM IST

घरासोबत परदेश प्रवास आणि कारची ऑफर!

दिवाळीला नवीन घर बुकिंग करण्याकडं ग्राहकांचा कल नेहमीच राहिलाय. परंतु रियल इस्टेटमध्ये असलेल्या मंदीमुळं मुंबई आणि परिसरातील अनेक गृहप्रकल्प ग्राहकांना आपल्याकडं वळविण्यासाठी विविध आमीषे दाखवत आहेत.

Oct 27, 2013, 06:45 PM IST

दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची लूट

दिवाळी आणि प्रवाशांची लूट हे जणु समिकरण बनलय. दिवाळीच्या काळात राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी फुल्ल असल्याचं फायदा घेत खाजगी ट्रॅव्हल्स सर्वसामन्य प्रवाशांकडुन अतिरीक्त पैसा उकळतात.

Oct 25, 2013, 09:23 PM IST