www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
बिहारमधील पाटणा येथील अतिरेकी हल्ल्यानंतर राज्यात अतिदक्षतेचा आदेश देण्यात आला आहे. दिवाळीच्या सणात हल्ल्याची शक्यता असल्याने मुंबईसह अन्य शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
सणासुदीच्या काळात गुप्तचर विभागाने राज्यात दहशतवादी हल्ला होण्याची शक्याता व्यक्तर केली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज येथे दिली. पाटणा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यात अतिदक्षतेचा आदेश देण्यात आला आहे. त्यातच दिवाळीचा सण सुरू होत असल्याने बाजारपेठांमध्ये गर्दी वाढत आहे. त्यासाठी गृह विभागाने सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवावा, अशा सूचना गृहमंत्री आर आर यांनी दिली आहे.
दरम्यान, दिवाळीनंतर सचिन तेंडुलकर मुंबईत शेवटचा कसोटी सामना खेळणार असल्याने गर्दीत आणखी भर पडण्याची शक्यईताही आहे. याचा फायदा घेऊन अतिरेकी संघटना हल्ला करण्याची शक्याता आहे; मात्र त्याबाबत कोणतीही ठोस माहिती अथवा संदेश मिळाला नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.