तृणमूल काँग्रेस

‘धरतीच्या अस्तित्वापर्यंत बलात्कार होतच राहतील’

‘जोपर्यंत पृथ्वीचं अस्तित्व असेल तोपर्यंत बलात्कार होतच राहतील’ असं वादग्रस्त वक्तव्य एका नेत्यानं केलंय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्यानं हे धक्कादायक विधान केलंय.

Aug 28, 2014, 04:10 PM IST

विरोधीपदासाठी काँग्रेस तर शिवीगाळ प्रकरणी तृणमूल आक्रमक

काँग्रेसनं विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी केलीय. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी आज संसदेच्या आवारात निदर्शनं केली.

Jul 9, 2014, 12:03 PM IST

नरेंद्र मोदींना अटक करा, तृणमूल काँग्रेसची मागणी

आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या अटकेची मागणी तृणमूल काँग्रेस पक्षानं केली आहे. जातीच्या नावावर मतं मागितल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेस पक्षानं मोदींविरोधात अटकेची मागणी करणारं पत्र निवडणूक आयोगाला पाठविलंय.

May 5, 2014, 10:20 PM IST

दिल्लीतील रॅलीत अण्णांनी मारली दांडी!

दिल्लीतल्या तृणमूल काँग्रेसच्या रॅलीला अखेर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी प्रकृतीचं कारण पुढं करत दांडी मारलीय. रामलीला मैदानावर घेण्यात आलेल्या या रॅलीत हजार लोकही जमलेली नव्हती.

Mar 12, 2014, 02:57 PM IST

अश्लील डान्स करणा-या कार्यकर्त्याविरोधात कारवाई

तृणमूल काँग्रेसच्या स्थापना दिवस कार्यक्रमात अश्लील डान्स करत गोंधळ घालणा-या कार्यकर्त्याविरोधात कारवाई करण्यात आलीय. या कार्यकर्त्याला तृणमूल पक्षातून निलंबित करण्यात आलंय.

Jan 2, 2013, 05:58 PM IST

तृणमूलचे राजीनामे खिशात, यूपीएचे दात घशात!

यूपीएमधील तृणमूल काँग्रेसच्या सातही मंत्र्यांनी राजीनामे दिल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे तृणमूल काँग्रेसचे प्रवक्त सुदीप बंडोपाध्याय यांनी आज स्पष्ट केले. परंतु, राजीनामे दिले नसले तरी राजीनामे तयार असल्याची गुगली बंडोपाध्याय यांनी टाकून पुन्हा यूपीएचे दात घशात घालण्याचा प्रयत्न केला आहे.

Jun 18, 2012, 08:24 PM IST

बाहेर पडणार नाही, सरकार पाडणार नाही- ममता

केंद्रातील यूपीए सरकारमधून बाहेर पडणार नाही किंवा सरकार पाडणार नाही, असे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रपती निवडणुकीबाबत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांच्याशी भेट करण्यापूर्वी ममतांनी हे स्पष्ट केले आहे.

Jun 14, 2012, 08:08 PM IST

ममतांनी घेतले सोनियांना शिंगावर!

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलामच राष्ट्रपतीपदाचे क्रमांक एकचे उमेदवार आहेत. आमचे उमेदवार कलाम आहे. यावर सर्वांनी एकमत करावे, असे सांगून तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना शिंगावर घेतले आहे.

Jun 14, 2012, 08:07 PM IST

ममता बॅनर्जींची केंद्रावर आगपाखड

तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा केंद्र सरकारवर आगपाखड केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या शपथविधीला जाणार नसल्याचे घोषित केले होते. परंतु यात आपल्या निर्णयावर पलटी मारली. ममता बॅनर्जी यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Mar 10, 2012, 09:40 PM IST

लोकसभेच्या निवडणुका व्हाव्यात- तृणमूल

पाच राज्यामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांचे पडसाद पडायला सुरूवात झाली आहे. या निवडणुकांमध्ये काँग्रेसला सपाटून मार खावा लागल्यानंतर युपीएतील सहकारी पक्षांनी आता काँग्रेसची टांग खेचण्याचे प्रकार सुरू केले आहेत.

Mar 8, 2012, 10:26 PM IST

'इंदिरा भवन'वरून काँग्रेस- ममतामध्ये रण

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी इंदिरा भवनचं नाव बदलण्याचा जो प्रस्ताव मांडला आहे, त्यावरून आता काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये वाद सुरू झाला आहे.

Jan 3, 2012, 10:15 PM IST