लोकसभेच्या निवडणुका व्हाव्यात- तृणमूल

पाच राज्यामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांचे पडसाद पडायला सुरूवात झाली आहे. या निवडणुकांमध्ये काँग्रेसला सपाटून मार खावा लागल्यानंतर युपीएतील सहकारी पक्षांनी आता काँग्रेसची टांग खेचण्याचे प्रकार सुरू केले आहेत.

Updated: Mar 8, 2012, 10:26 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

पाच राज्यामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांचे पडसाद पडायला सुरूवात झाली आहे. या निवडणुकांमध्ये काँग्रेसला सपाटून मार खावा लागल्यानंतर युपीएतील सहकारी पक्षांनी आता काँग्रेसची टांग खेचण्याचे प्रकार सुरू केले आहेत. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालामुळे स्पष्ट झाले आहे की, आता लोकसभेच्या निवडणुका व्हायला हव्यात, असे मत रेल्वेमंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते दिनेश त्रिवेदी यांनी व्यक्त केले आहे.

 

सध्याची परिस्थिती पाहता लोकसभेच्या निवडणुका लवकरच होऊ शकतात, असे माझे वैयक्तिक मत असल्याचेही दिनेश त्रिवेदी यांनी सांगितले.

 

येत्या शुक्रवारी कोलकतामध्ये तृणमूल काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक होणार आहे. त्यात काँग्रेसच्या पराभवानंतर तृणमूल काँग्रेस आता आपल्या पक्षाची रणनिती बदल्याचा विचार करीत आहे.  मुलायम सिंग, शरद यादव, चंद्रबाबू नायडू, जयललिता आणि नवीन पटनायक यांच्यासह ममता बॅनर्जी तिसरी आघाडी करण्याचा विचार करू शकतात. त्यामुळे ते लोकसभेच्या निवडणुका घेण्यासाठी केंद्र सरकारला भाग पाडू शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

 

पाच राज्यातील निवडणूक निकालांनंतर सप आणि तृणमूल काँग्रेस मध्यावधी निवडणुका घेण्याचा विचारात असतील, त्रिवेदी असे त्रिवेदी यांनी सांगितले. दोन वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुका आताच व्हाव्यात असे, तृणमूल काँग्रेस नक्कीच वाटणार, तसेच काँग्रेसच्या पराभवानंतर भाजपही हाच विचार करीत असेल असेही त्रिवेदी म्हणाले.