'तुझा माजी प्रियकर आता मोठा भाऊ' मुलाने अ‍ॅप्लिकेशन लिहित प्रेयसीशी केला ब्रेकअप.. फोटो तुफान व्हायरल

Trending News : सोशल मीडियावर एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो एका बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफ्रेंडसाठी लिहिलेलं पत्र आहे. या पत्रात बॉयफ्रेंडने का ब्रेकअप करत असल्याचं लिहिलं आहे. 

राजीव कासले | Updated: Sep 25, 2024, 03:19 PM IST
'तुझा माजी प्रियकर आता मोठा भाऊ' मुलाने अ‍ॅप्लिकेशन लिहित प्रेयसीशी केला ब्रेकअप.. फोटो तुफान व्हायरल title=

Trending News : सोशल मीडियावर कोणती गोष्ट कधी व्हायरल होईल याचा काही नेम नाही. दररोज हजारो पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या जात असतात. यातल्या काही पोस्ट चांगल्याच चर्चेत येतात. सध्या सोशल मीडियावर अशीच पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये एका बॉयफ्रेंडने (Boyfriend) आपल्या गर्लफ्रेंडसाठी (Girlfriend) लिहिलेलं पत्र आहे. या पत्रात बॉयफ्रेंडने का ब्रेकअप (Break up Application) करत असल्याचं लिहिलं आहे. हे पत्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालं आहे. ऑफिसमध्ये ज्याप्रमाणे आपल्या नोकरीचा राजीनामा लिहताना अ‍ॅप्लीकेशन लिहितो, त्याप्रमाणेच या मुलाने ब्रेकअप अ‍ॅप्लीकेशन लिहिलं आहे.

काय आहे व्हायरल पत्रात

एका मुलाने आपल्या गर्लफ्रेंडशी ब्रेकअप करण्यासाठी अनोखा मार्ग निवडला. या मुलाने चक्क अ‍ॅप्लिकेशन लिहित गर्लफ्रेंडशी ब्रेकअप केला आहे. यासोबतच आपण नव्या नात्यात आल्याचंही त्या मुलाने या पत्रात म्हटलं आहे. अ‍ॅप्लिकेशन लिहिणाऱ्या मुलाचं नाव सुजान असं आहे. सुजानने आपल्या ब्रेकअप अ‍ॅप्लिकेशनमध्ये म्हटलंय 'माझी प्रिय प्रेयसी, एकवीसव्या शतकात तुझ्या सारख्या मुलीबरोबर रिलेशनशीपमध्ये राहण्याची माझ्या सारख्या मुलाची हिंमत नाहीए. त्यामुळे तुझ्याबरोबरचं नातं मी संपवत आहे. माझी काही चूक झाली असेल तर मला मोठा भाऊ समजून माफ कर. अ‍ॅप्लिकेशनमध्ये खाली या मुलाने तुझा मोठा भाऊ सुजान असं लिहिलं आहे. विशेष म्हणजे ज्या प्रमाणे राजीनामा देताना विषय लिहिला जातो, त्याचप्रमाणे या मुलाने पत्राच्या सुरुवातील विषय - ब्रेकअप हवाय असं लिहिलं आहे.

मुलाचं हे पत्र चांगलंच व्हायरल झालं आहे. हे पत्र इन्स्टाग्रामवर GHANTAA नावच्या पेजवरुन शेअर करण्यात आलं आहे. या पोस्टला आतापर्यंत 21 हजार लोकांनी लाईक केलं आहे. यावर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत. एका युजरने म्हटलं, भाऊ तू अ‍ॅप्लिकेशनमध्ये kindly grant me breakup असं लिहिलायला विसरलास वाटतं. एका युजरने म्हटलं, मित्रा तू वेगाने प्रियकरापासून भाऊ बनलास. तर एका युजरने ब्रेकअक करण्याची पद्धत आवडली असल्याचं लिहिलं आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x