मनसेला आडकाठी, आठवले-भुजबळांच्या भेटीगाठी
नाशिक महापालिकेच्या सत्तासमीकरणांत नवे रंग भरलेत. भुजबळांनी आठवलेंना महापौरपदाची ऑफर दिली. शिवसेना-भाजप युतीचा पाठिंबा मिळाला तर तीन पक्षांच्या पाठिंब्यानं नाशिकमध्ये आठवलेंचा महापौर होऊ शकतो.
Feb 22, 2012, 10:06 PM ISTनाशिकमध्ये आघाडीचा 'ब्लेमगेम'
नाशिकचा गड राखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी केली. इतकं करुनही आघाडीची गाडी फक्त ३५ जागांपर्यंतच पोहोचू शकली. त्यामुळेच आता पराभवाचं खापर एकमेकांवर फोडत ब्लेमगेमला सुरुवात झाली आहे.
Feb 22, 2012, 08:29 PM ISTनाशकात सत्तेसाठी अपक्षांना भाव
नाशिक महापालिकेच्या निकालानंतर आता सगळ्याच पक्षांच्या गणितज्ज्ञांनी आकडेमोड करायला सुरुवात केलीय. या सर्वांच्या केंद्रस्थानी अपक्ष आणि छोटे पक्ष आहेत. अपक्षांच्या मदतीशिवाय सत्ता स्थापन करणं शक्यच नसल्यामुळं अपक्षांचा भाव भलताच वाढलाय.तर नाशिकमध्ये सत्तास्थापनेचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिलेत.
Feb 22, 2012, 10:32 AM ISTपवारांना कोंबडी, तंगड्यांशिवाय काही दिसत नाही - उद्धव
शरद पवारांना आजकाल कोंबडी आणि तंगड्यांशिवाय काही दिसत नाही असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी नाशिकमध्ये आपल्या प्रचाराचा धडाका सुरू केला. सोनेरी कोंबडी कलानगरच्या खुराड्यातून बाहेर काढा याला प्रत्युत्तर देताना उद्धव यांनी शरद पवारांचा चांगलाच समाचार घेतला.
Feb 11, 2012, 11:56 AM ISTभुजबळांविरोधात आचारसंहिताभंगाची तक्रार दाखल
भुजबळ फाऊण्डेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नाशिक फेस्टिवलसंदर्भात ही तक्रार दाखल झाली आहे. नाशिकमध्ये आचारसंहिताभंगाचे अनेक प्रकार घडत असतानाही निवडणूक आय़ोग उदासीनच असल्याचा आरोप होत आहे.
Jan 24, 2012, 10:53 PM ISTछगन भुजबळ जाणार दिल्लीच्या राजकारणात
राष्ट्रवादीचे बडे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी केंद्राच्या राजकारणात जाण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यासोबतच येत्या मनपा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्याची तयारी दर्शवली आहे, आघाडी बाबतच्या उलटसुलट चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
Dec 29, 2011, 11:06 PM ISTभुजबळांच्या राजीनाम्याची मागणी
सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. इंडिया बुल्स प्रकरणावरून भुजबळ यांच्या राजीनाम्याची करण्यात आली आहे.
Dec 13, 2011, 08:09 AM ISTF1 ट्रॅकवरून आरोपांच्या गाड्या सुसाट!
दिल्लीजवळ ग्रेटर नोएडामध्ये जगातील सर्वोत्कृष्ट रेसिंग ट्रॅकपैकी तयार झालेल्या रेसिंग ट्रॅकवर यशस्वी स्पर्धा पार पडल्यानंतर आता महाराष्ट्रात या ट्रॅकवरून राष्ट्रवादीने काँग्रेसविरोधातील आरोपांची गाडी सुसाट सोडली आहे.
Oct 31, 2011, 11:21 AM IST