भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. इंडिया बुल्स प्रकरणावरून भुजबळ यांच्या राजीनाम्याची करण्यात आली आहे.

Updated: Dec 13, 2011, 08:09 AM IST

झी २४ तास वेब टीम, नागपूर

 

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. इंडिया बुल्स प्रकरणावरून भुजबळ यांच्या राजीनाम्याची करण्यात आली आहे.

 

या प्रकरणावरून विधानसेत रणकंद माजले. मनसेनेही राजीनाम्याची मागणी केली. सरकार भुजबळांना पाठीशी घालणार का, असा सवाल आमदार बाळा नांदगावकर यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली. इंडिया बुल्स कंपनीने  छगन भुजबळ यांच्या भुजबळ फाऊंडेशनला दिलेल्या देणगीचे प्रकरण उघडकीस आल्याच्या पाश्र्वभूमीवर मनसेने ही मागणी केली. यावेळी सभागृहात फलकही दाखविले.

 

काय आहे प्रकरण

इंडिया बुल्स कंपनीने सिन्नर तालुक्यातील गुळवंच व मुसळगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी एक लाख ३५ रूपये एकरने घेऊन त्याच  मिनींची विक्री एक ते दोन कोटी प्रतिएकर दराने  करण्यात येत आहे, असा आरोप करण्यात आला आहे.

 

बडय़ा उद्योग समुहांकडून कोटय़वधीची बेकायदेशीर देणगी स्वीकारणे गैर असून अशा स्वरूपाची रक्कम ही लाच समजण्यात यावी आणि सार्वजनिक पदावरील व्यक्ती किंवा त्यांच्या संस्थांना उद्योग समुहाकडून देणग्या घेण्यास प्रतिबंध करणारा कायदा करावा, अशी मागणी मार्क्‍सवादी कम्युनिष्ट पक्षाने केली आहे.

 

ही कंपनी संपूर्ण राज्यात आणि देशात अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल किंमतीत संपादीत करून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून स्वत:चे उखळ पांढरे करीत असल्याचा आरोप माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य डॉ. डी. एल. कराड यांनी केला आहे. इंडिया
बुल्स या कंपनीला केंद्र व राज्य सरकारच्या बडय़ा अधिकारी व राजकीय नेत्यांचा वरदहस्त लाभला आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या लुटीला विरोध करणाऱ्या चळवळी दडपण्यासाठी पोलिसांचा वापर करण्यात आला, याचे प्रत्यंतर सिन्नर  तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनुभवले असल्याचे माकपने म्हटले आहे.