गुन्हा

सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ, १७ तासात १४ घटना

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी.... सोनसाखळी चोरांनी पुण्यात अक्षरशः धुमाकूळ घातलाय. पुण्यात फक्त १७ तासांत सोनसाखळी चोरीच्या तब्बल १४ घटना घडल्यायत. या १४ घटनांमध्ये महिलांच्या गळ्यातील तब्बल अर्धा किलो सोन्यावर डल्ला मारण्यात आलाय.

Dec 7, 2013, 12:59 PM IST

लिव्ह इन रिलेशन म्हणजे पाप नाही - सुप्रिम कोर्ट

लिव्ह इन रिलेशनशिप हा गुन्हा किंवा पाप नाही, असं सुप्रिम कोर्टानं म्हटलंय. मात्र लिव्ह इन रिलेशनमध्ये असलेल्या महिलेला कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण मिळू शकत नाही. अशा महिलांच्या संरक्षणासाठी नवीन कायदे करावे किंवा कौटुंबिक हिंसाचार कायद्यात सुधारणा करावी असे निर्देश सुप्रिम कोर्टानं संसदेला दिले आहेत.

Nov 29, 2013, 05:37 PM IST

आर्थिक गुन्हेगारीची नवी राजधानी- नागपूर!

नागपूरसह विदर्भातल्या शेकडो गुंतवणुकदारांची फसवणूक करणा-या श्री सुर्या कंपनीचे तपशील बाहेर येतायत. त्याचवेळी नागपूरात गेल्या साडेचार वर्षात आर्थिक फसवणुकीचे 1 हजार 283 गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.

Oct 29, 2013, 05:53 PM IST

अबु सालेम टोळीतल्या गुन्हेगाराला अटक

ठाण्यात एका ज्वेलर्सवर दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या अबू सालेम टोळीतील एका सराईत गुन्हेगाराला नौपाडा पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. राजेश हातणकर असे या गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर खुनाचे १५ गुन्हे दाखल आहेत.

Oct 26, 2013, 04:47 PM IST

योगगुरू रामदेव बाबांच्या भावावर अपहरणाचा गुन्हा

सरकार लोकशाहीची थट्टा उडवत आहे. भाऊ राम भरतवर गुन्हा दाखल झाल्यानं योगगुरू रामदेव बाबांनी सरकारवर नव्यानं हल्लाबोल केला आहे. योगगुरू रामदेव बाबा यांचा भाऊ राम भरत याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे रामदेव बाबांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Oct 22, 2013, 02:01 PM IST

बारा वर्षांच्या मुलानं केली पंधरा वर्षांच्या मुलाची हत्या

दुर्दैवानं लहान वयातच मुलांमधली हिंसक प्रवृत्ती वाढतेय. त्याची दोन धक्कादायक उदाहरणं समोर आलीयत. ठाण्यात अवघ्या बारा वर्षांच्या मुलानं पंधरा वर्षांच्या मुलाचा खून केलाय.

Oct 9, 2013, 07:58 PM IST

फरार नारायण साई नेपाळमध्ये गेल्याची शंका

लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेला आसाराम बापूंचा मुलगा नारायण साई नेपाळमध्ये पळून गेल्याची बातमी आहे. त्याच्याच तपासासाठी सूरत पोलीस बिहारला रवाना झाले आहेत. पोलीस नारायण साईंच्या पासपोर्ट विषयी माहिती घेत आहेत.

Oct 8, 2013, 11:22 AM IST

राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत?

राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असताना गृहमंत्री आर.आर.पाटील काय करत आहेत हा प्रश्न कायम आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 45 दिवसं उलटलीत तरी मारेकरी मोकाट आहेत.

Oct 3, 2013, 08:01 PM IST

गुन्हा कबूल पण सत्य समोर येईलच- आसाराम बापू

अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप असलेले संत आसाराम बापू रविवारी पहिल्यांच सगळ्यांच्या समोर आले. पहासात्मक शैलीत त्यांनी सर्वांसमोर आपल्यावरील आरोप स्विकारले. मात्र लगेचच त्यांनी स्वत:ला निर्दोष असल्याचं म्हणत लवकरच सत्य समोर येईल, असंही म्हटलंय.

Aug 26, 2013, 10:06 AM IST

१८ वर्षांखालील मुलीशी संमतीनं शरीरसंबंध गुन्हा नाही!

१८ वर्षांखालील मुलीशी संमतीनं शरीरसंबंध हा गुन्हा ठरत नाही, असं दिल्लीतल्या एका स्थानिक कोर्टानं म्हटलंय. त्यामुळं `लैंगिक अत्याचारापासून लहान मुलांचं संरक्षण` या कायद्याअंतर्गत हा गुन्हा ठरत नाही, असं कोर्टानं स्पष्ट केलंय.

Aug 26, 2013, 08:50 AM IST

गर्दुल्ल्यांची गुन्हेगारी, पोलिसांची लाचारी

गेल्या काही दिवसांमधील घटना पाहता गर्दुल्यांची वाढती गुन्हेगारी मुंबईकरांची डोकेदुखी वाढवणारा ठरत आहे. फोफावलेले ड्रग्जमाफिया आणि निष्क्रिय पोलीस प्रशासन. यामुळं गर्दुल्यांचे फावत आहे.

Aug 25, 2013, 04:54 PM IST

असा कसा हा `आसाराम`?

आध्यात्मिक गुरु आसाराम बापू पुन्हा एका नव्या वादात सापडले आहेत. आसाराम बापूंच्याविरोधात दिल्लीच्या कमनला नगरमध्ये लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Aug 22, 2013, 07:21 PM IST

राष्ट्रध्वजाच्या अवमानाचा अण्णांविरोधात गुन्हा!

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविरोधात राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश जौनपूर कोर्टानं दिले आहेत. हिंमाशू श्रीवास्तव या स्थानिक वकिलानं अण्णा हजारेंविरोधात तक्रार दाखल केली होती.

Aug 18, 2013, 02:04 PM IST

रेश्मा बिर्जेच्या हत्येच गूढ उकललं!

कल्याणमधल्या रेश्मा बिर्जे या तरुणीच्या हत्येचे गूढ उकललंय. तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचं आता उघड झालंय. त्याला विरोध केल्यानं तिची हत्या झाल्याचं आता समोर आलंय.

Jul 16, 2013, 08:36 PM IST

आता महिलांशी एकतर्फी चॅटिंग केल्यास तुरुंगवास!

आता चॅटिंग करताना तरुणांना अधिक सावध व्हावं लागणार आहे. एखाद्या मुलीला किंवा महिला प्रतिसाद देत नसतानाही तुम्ही ऑनलाईन चॅटिंग करत राहिलात, तर तुम्हाला तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते.

Jul 16, 2013, 05:17 PM IST