T20 वर्ल्ड कप जिंकलेल्या टीम इंडियाचं मुंबईत जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मुंबईच्या क्विन नेकलेसपासून ते वानखेडेपर्यंत वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाची Victory Parade काढण्यात आली. यावेळी लाखोंच्या संख्येने मुंबईकर आणि मुंबई बाहेरून आलेले असंख्य क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. क्विन नेक्लेसच्या परिसरात जनसमुदाय जमा झाला होता.
या विक्ट्री परेडचे असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. यामध्ये एका तरुणीला खांद्यावर घेऊन जाणाऱ्या मुंबई पोलिसाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला. या पोलिसांनी मुंबईकरांचं मन जिंकलं.
विजय परेडच्या गर्दीत एक तरुणी बेशुद्ध पडली. रस्त्यावर हजारो लोकांच्या त्या गर्दीमुळे त्या तरुणीसोबत काहीही अनुचित प्रकार घडू शकतो. मात्र तेवढ्यात हवालदार सईद सलीम पिंजारी हे देवदूताच्या भूमिकेत पोहोचले आणि तरुणीला खांद्यावर घेऊन गर्दीतून सुखरूप बाहेर काढले.
सईद सलीम पिंजारी आणि त्याची सहकारी तरुणीला गर्दीतून मोकळ्या जागी घेऊन गेले. जिथे तिला मोकळा श्वास घेणे शक्य होते. पाणी देऊन आणि चॉकलेट देऊन त्यांची तब्बेत ठीक होईपर्यंत काळजी घेतली. त्यानंतर ऍम्ब्युलन्सच्या मदतीने त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले.