कामगार

'नवीन किमान वेतन' कधीपासून लागू करणार?

'नवीन किमान वेतन' कधीपासून लागू करणार?

Jul 21, 2015, 08:56 PM IST

मोदी सरकारनं दिली कामगारांसाठी खुशखबर...

मोदी सरकारनं कामगारांसाठी एक खुशखबर दिलीय. सरकारनं कामगारांच्या किमान वेतनात 23 रुपयांनी वाढ केलीय. त्यामुळे आता कामगारांना किमान 160 रुपये प्रतिदिन मजुरी मिळू शकेल. 

Jul 8, 2015, 08:54 AM IST

महाड औद्योगिक वसाहतीत वायू गळती, ४ कामगारांचा जागीच मृत्यू

 रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहतीतील शकील भंगार डेपोत ड्रममध्ये असलेल्या केमिकलचा किरकोळ स्फोट झाल्यानंतर वायू गळती झाली. त्यात चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर महाड येथील ट्रोमा केअर आणि देशमुख नर्सिंग होममध्ये ऊपचार सुरू आहेत.

Jun 18, 2015, 09:10 AM IST

सांगलीत शोभेची दारु बनवणाऱ्या कंपनीत स्फोट, ५ ठार

सांगलीतील कवठे एकंद इथं शोभेची दारु बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट झाल्यानं पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज संध्याकाळी घडली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

May 4, 2015, 08:00 PM IST

कंत्राटी कामगार कायद्याचं पालिकेकडून उल्लंघन

कंत्राटी कामगार कायद्याचं पालिकेकडून उल्लंघन

May 1, 2015, 10:05 PM IST

कामगार नेत्याला मारहाण अंगलट; तरी पोलिसांची दबंगगिरी सुरूच

चंद्रपूरमधील राष्ट्रवादीचे कामगार नेते प्रमोद मोहोड यांना वरोरामध्ये ‘डीवायएसपी’ गणेश गावडे यांनी केलेली जबर मारहाण उभ्या महाराष्ट्राच्या समोर आली. मात्र, एवढ्यावरच पोलिसांचं समाधान झालेलं नाही.

Dec 22, 2013, 08:20 PM IST

कामगार-सुरक्षारक्षकांच्या मुलांसाठी मोफत लॅपटॉप!

निवडणुका जवळ येऊ लागल्याने लोकप्रिय योजना आणि घोषणांचा पाऊस पडायला सुरुवात झालीय. एकीकडे कामगारांना रोजगार देण्याची मारामार असताना, कामगारांच्या आणि सुरक्षारक्षकांच्या मुलांना मोफत लॅपटॉप आणि टॅबलेट देण्याची योजना राज्याच्या कामगार विभागाने आखलीय.

Nov 9, 2013, 03:09 PM IST

बजाजमधील `बंद`वर तोडगा कधी निघणार?

पिंपरी चिंचवड जवळील चाकण इथल्या बजाज ऑटो प्लांट मधल्या कामगारांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदचा आज चाळीसावा दिवस आहे. कामगार आणि बजाज प्रशासन दोन्हीही आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामूळं यातून अजूनही तोडगा निघालेला नाही.

Aug 3, 2013, 06:19 PM IST

`राज ठाकरेंचा मुद्दा कोणी उचलला, केरळी धास्तावले`

नोकरीमध्ये भूमिपुत्रांनाच प्राधान्य दिले गेलेच पाहिजे, ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका प्रथमपासून राहिली आहे. ही भूमिका आता सौदी अरेबियात सुरू करण्यात आली आहे. तसा नवा कायदा गुरुवारपासून सौदीत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सौदीमध्ये काम करणाऱ्या सात लाख केरळी कामगारांना रोजगारापासून मुकावे लागल्याने ते धास्तावलेत.

Apr 1, 2013, 10:11 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माजले आहेत- उद्धव ठाकरे

मुंबईत विराट कामगार मोर्चात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण..... ३५ कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. २ लाख कामगार मोर्चात सहभागी झाले आहेत. शिवसेनेचा कामगारांना पाठिंबा दिला आहे. या प्रसंगी भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी पुढील मुद्दे माडंले-

Feb 18, 2013, 06:50 PM IST

मारुती सुझुकीचा कारखाना बंदोबस्तात सुरू

कामगार आणि व्यवस्थापनातील वादामुळे हरियानातील गुडगावमधील गेल्या महिनाभरापासून बंद असलेला मारुती सुझुकीचा मनेसर येथील कारखाना कडक पोलीस बंदोबस्तात आज मंगळवारी उघडण्यात आला.

Aug 21, 2012, 12:23 PM IST

गिरणीसाठी कामगारांचा रस्त्यावर ठिय्या!

www.24taas.com, मुंबई

मुंबईतल्या युनायटेड मिलमध्ये गिरणी कामगारांनी घुसण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांनी सातशे आंदोलक गिरणी कामगारांना अटक केलीये. पण या गिरणी कामगारांनी जामीन नाकारलाय आणि ठिय्या आंदोलन सुरू केलंय.

 

Mar 1, 2012, 09:32 PM IST

ऊस कामगार मतदानापासूनच दूरच !

पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोडणी कामगार पाठीवर संसार घेऊन फिरत असतात. यामुळेच पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणीसाठी आलेले सुमारे दोन लाख कामगार यावेळी मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

Feb 4, 2012, 04:17 PM IST