सांगलीत शोभेची दारु बनवणाऱ्या कंपनीत स्फोट, ५ ठार

सांगलीतील कवठे एकंद इथं शोभेची दारु बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट झाल्यानं पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज संध्याकाळी घडली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

Updated: May 4, 2015, 08:28 PM IST
सांगलीत शोभेची दारु बनवणाऱ्या कंपनीत स्फोट, ५ ठार title=

सांगली: सांगलीतील कवठे एकंद इथं शोभेची दारु बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट झाल्यानं पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज संध्याकाळी घडली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 


सांगलीतील कवठे एकंद इथं शोभेची दारु बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट झाल्यानं पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज संध्याकाळी घडली.

कवठे एकंद इथं शोभेची दारु बनवणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. यातील ईगल या कंपनीत आज संध्याकाळी स्फोट झाला. या स्फोटात कंपनीत काम करणाऱ्या पाच कामगारांचा मृत्यू झाला. तर चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. 

हा स्फोट झाला त्यावेळी कंपनीत सुमारे १० ते १२ कामगार काम करत होते अशी शक्यता वर्तवली जात आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मृतांमध्ये महिला कामगारांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.