महाड औद्योगिक वसाहतीत वायू गळती, ४ कामगारांचा जागीच मृत्यू

 रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहतीतील शकील भंगार डेपोत ड्रममध्ये असलेल्या केमिकलचा किरकोळ स्फोट झाल्यानंतर वायू गळती झाली. त्यात चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर महाड येथील ट्रोमा केअर आणि देशमुख नर्सिंग होममध्ये ऊपचार सुरू आहेत.

Updated: Jun 18, 2015, 11:56 AM IST
महाड औद्योगिक वसाहतीत वायू गळती, ४ कामगारांचा जागीच मृत्यू  title=

अलिबाग :  रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहतीतील शकील भंगार डेपोत ड्रममध्ये असलेल्या केमिकलचा किरकोळ स्फोट झाल्यानंतर वायू गळती झाली. त्यात चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर महाड येथील ट्रोमा केअर आणि देशमुख नर्सिंग होममध्ये ऊपचार सुरू आहेत.

रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या वायुगळतीमुळे परीसरात दुर्गंधी पसरली असून यापासून कोणालाही इजा होऊ नये म्हणून प्रशासन खबरदारी घेत आहे. हा भंगारडेपो शकील नामक इसमाचा असून येथे सात ते आठ कामगार काम करीत होते.

आता या भंगारडेपोसाठी परवानगी होती किंवा नाही, कोणी परवानगी दिली, हे केमिकल असलेले ड्रम भंगारडेपोत आणण्यास परवानगी आहे काय असे प्रश्न पुढे येत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.