काँग्रेस

काँग्रेसला मोठा झटका, रीता बहुगुणा भाजपमध्ये जाण्याची शक्यता

उत्तर प्रदेश निवडणुकीआधी काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Oct 17, 2016, 08:33 PM IST

सांगलीतील आर आर आबांचा गड राष्ट्रवादी कायम राखणार का?

तासगाव नगरपालिकेची निवडणूक यंदा सुद्धा चुरशीची होणार आहे. नेमकं काय चित्र आहे याठिकाणी. कुणाची सरशी होऊ शकते पाहूयात त्यासंदर्भातला रिपोर्ट. (व्हिडिओ पाहा बातमीच्या खाली)

Oct 14, 2016, 11:29 PM IST

सांगलीत काँग्रेस, राष्ट्रवादीला भाजप आणि शिवसेनेनं मोठे आव्हान

जिल्ह्यात इस्लामपूर, आष्टा, तासगाव, विटा या पूर्वीच्या आणि नव्यानं अस्तित्वात आलेली पलूस अशा पाच नगरपालिका आहेत. तर कवठे-महांकाळ, कडेगाव, खानापूर आणि शिराळा या चार नगरपंचायती तयार करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र 2014 नंतर भाजप आणि शिवसेनेनं मोठं आव्हान निर्माण केलंय. (व्हिडिओ बातमीच्या खाली)

Oct 14, 2016, 11:21 PM IST

सर्जिकल स्ट्राईकवरुन उद्धव ठाकरेंची भाजपसह काँग्रेसवर टीका

काश्मीरमधील उरी हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईक वरून लज्जास्पद राजकारण चालू आहे, अशी टीका भाजपसह काँग्रेसवर शिवसेना कार्यध्येक्ष उद्धव ठाकरे यांनी केलीय. 

Oct 14, 2016, 08:06 AM IST

जालना पालिकेसाठी काँग्रेस-शिवसेनेत घमासान

जिल्ह्यात चार नगरपालिकांच्या निवडणुका पार पडतायेत सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या असून जालना पालिका ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस शिवसेनेत जोरदार घमासान होण्याची चिन्ह आहेत.

Oct 13, 2016, 07:25 PM IST

जालना पालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेस गड राखणार की युती मुसंडी मारणार?

जिल्ह्यात जालना, अंबड, परतूर आणि भोकरदन नगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आल्यानं राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. जालना जिल्ह्यात चार नगरपालिकांसाठी ही निवडणूक होणार आहे.

Oct 13, 2016, 07:17 PM IST

धुळे जिल्ह्यात पालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीला भाजप शह देणार का?

जिल्ह्यातल्या शिरपूर आणि दोंडाईचा या दोन नगरपालिका काँग्रेस पक्षाचे दोन दिग्गज नेते सांभाळत आहेत. गेल्या दोन तपापासून आमदार असलेले माजी मंत्री  अमरिश पटेल यांनी शिरपूर पालिकेवर अविरत निर्विवाद सत्ता टिकवून ठेवली आहे तर दोंडाईचा पालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आता स्वगृही परतलेले माजी मंत्री डॉ हेमंत देशमुख यांच्या हातात दहा वर्षांपासून आहे. या दोन्ही ठिकाणी भाजप काँग्रेसच्या या नेत्यांना धडक देणारेत. 

Oct 12, 2016, 09:35 PM IST