कळवा

मनसेचा कळवा हॉस्पिटलला दणका, हाऊस ऑफिसर निलंबित

कळवा हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलेला उपचार न मिळाल्यानं मनसेनं रुग्णालयात आज हंगामा केला. दरम्यान, या मुजोरी प्रकरणी हाऊस ऑफिसर सविता उप्पड यांचं निलंबन करण्यात आलंय. 

Mar 13, 2015, 10:43 PM IST

कळव्यात अंतर्गत वादातून एकाची निर्घून हत्या, केलेत २७ वार

अंतर्गत वादातून आरपीआय एकतावादीच्या कळव्यातील कार्याध्यक्षाची निर्घून हत्या करण्यात आली.या घटनेत चार जण जखमी झालेत. कळवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली.

Dec 17, 2014, 09:37 AM IST

कळवा येथे बालविवाहाचा कट उधळलला, भटजीसह वडिलांना अटक

कळवा येथे बालविवाहाचा कट उधळलला, भटजीसह वडिलांना अटक

Dec 4, 2014, 09:27 PM IST

कळवा येथे बालविवाहाचा कट उधळलला, भटजीसह वडिलांना अटक

पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवणा-या महाराष्ट्रात आजही बालविवाहासारखी वाईट प्रथा सुरूच आहे... ठाण्यानजीकच्या कळवा भागात अशी एक घटना उजेडात आली. सुदैव एवढंच की, पोलिसांनी लग्नाच्या मांडवातच नवरदेव, वरपिता, वधूपिता, लग्न लावणारा भटजी यांच्या मुसक्या आवळल्या. आणि बालविवाहाचा हा कट उधळून लावला. 

Dec 4, 2014, 11:24 AM IST

मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापकाकडून 30 विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार

ठाण्यात कळव्यामधल्या राजीव गांधी मेडिकल कॉलेजमध्ये एका प्राध्यापकानं जवळपास 30 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचं समोर आलंय. विद्यार्थिनींनी यासंदर्भात डरपोक स्टुडन्स या बनावट मेलद्वारे ठाणे पोलीस आयुक्त आणि रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केलीय.

Jun 10, 2014, 12:06 PM IST

महापालिकेविरुद्ध पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल

ठाणे महापालिकेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कळव्यातील एका प्रकरणात करारपत्रात नमूद असलेल्या जागेपेक्षा कमी आकाराची घरं दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

May 21, 2014, 08:19 AM IST

ठाण्यात पुन्हा कोसळली इमारत, जीवितहानी टळली

ठाण्यातील कळवा भागात आज रात्री पुन्हा एक इमारत कोसळली. पण, या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

Nov 18, 2013, 08:00 AM IST

राहुल गांधीचा कित्ता शरद पवार गिरवणार

काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी मुंबईत लोकलने प्रवास केला होता. हाच कित्ता आता राष्ट्रवादीचे नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार गिरवणार आहेत. पवार हे मुंबईत लोकलने प्रवास करणार आहेत.

May 14, 2013, 01:28 PM IST