महापालिकेविरुद्ध पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल

ठाणे महापालिकेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कळव्यातील एका प्रकरणात करारपत्रात नमूद असलेल्या जागेपेक्षा कमी आकाराची घरं दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 21, 2014, 08:19 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाणे महापालिकेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कळव्यातील एका प्रकरणात करारपत्रात नमूद असलेल्या जागेपेक्षा कमी आकाराची घरं दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
ठाण्यातील प्रसिद्ध वास्तुविशारद प्रवीण जाधव, बिल्डर मंगला आणि त्यांना साथ दिल्यामुळे पालिका नगररचना विभागातील अधिकाऱ्यांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ‘अप्पर क्रस्ट’ या गृहसंकुलातील 40 घरांचा ताबा 2011 मध्ये रहिवाशांना देण्यात आला.
बिल्डरने करारनाम्यात नमूद केल्याप्रमाणे घरं मिळतील असा विश्वास इथल्या रहिवाशांना होता. मात्र, घराचा ताबा घेतला असता प्रत्यक्षात ही घरं 20 ते 85 चौरस फुटांनी कमी असल्याचं लक्षात आलं. या प्रकरणी सुरुवातीला रहिवाशांनी बिल्डर आणि वास्तुविशारदाकडे पाठपुरावा केला. मात्र, त्यांनी दाद दिली नसल्याचा रहिवाशांचा आरोप आहे.
ठाणे पालिकेतील अधिकारी, बिल्डर आणि वास्तुविशारदाच्या अभद्र युतीत ग्राहक कसा भरडला जातो, याचं उदाहरण घटनेमुळे समोर आलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.