मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापकाकडून 30 विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार

ठाण्यात कळव्यामधल्या राजीव गांधी मेडिकल कॉलेजमध्ये एका प्राध्यापकानं जवळपास 30 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचं समोर आलंय. विद्यार्थिनींनी यासंदर्भात डरपोक स्टुडन्स या बनावट मेलद्वारे ठाणे पोलीस आयुक्त आणि रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केलीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 10, 2014, 12:06 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाण्यात कळव्यामधल्या राजीव गांधी मेडिकल कॉलेजमध्ये एका प्राध्यापकानं जवळपास 30 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचं समोर आलंय. विद्यार्थिनींनी यासंदर्भात डरपोक स्टुडन्स या बनावट मेलद्वारे ठाणे पोलीस आयुक्त आणि रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केलीय. रुग्णालय प्रशासन आणि कळवा पोलिसांनी याप्रकरणी दोन वेगवेगळ्या चौकशी समिती स्थापन करून या गुन्ह्याचा तपास सुरू केलाय.
महापालिकेनं प्राध्यापक डॉक्टर शैलेश्वर नटराजन यांना निलंबित केलं. मात्र अजूनही या प्राध्यापकाला अटक करण्यात आलेली नाही. प्राध्यापक नटराजनवर आणि त्याला अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी सत्ताधारी आणि विरोधकांनी केलीय.
तर यावर आम्ही त्या प्राध्यापकाला निलंबित केलंय. पोलीस त्याची तपासणी करतायत असं उत्तर ठाणे महापालिका प्रशासनानं दिलंय. काँग्रेस नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी कळवा रुग्णालयाच्या अधिष्ठाता मैत्रा यांना आयुक्त कार्यालयाबाहेर फैलावर घेतलं तसंच अतिरिक्त आयुक्त शामसुंदर पाटील यांनाही धारेवर धरलं. महापालिकेची महिला बालकल्याण समितीही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.